वैद्यकीय अधिकार्‍यांची १५ पदे रिक्त

By admin | Published: July 10, 2014 11:24 PM2014-07-10T23:24:41+5:302014-07-10T23:24:41+5:30

सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यासह इतर कर्मचार्‍यांची रिक्त पदे असल्याने आरोग्य सेवा प्रभावीत झाली आहे.

15 posts of medical officers vacant | वैद्यकीय अधिकार्‍यांची १५ पदे रिक्त

वैद्यकीय अधिकार्‍यांची १५ पदे रिक्त

Next

खामगाव : येथील सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यासह इतर कर्मचार्‍यांची रिक्त पदे असल्याने आरोग्य सेवा प्रभावीत झाली आहे. एकीकडे ह्यहायटेकह्ण रुग्णालय बनविण्याचा प्रयत्न चालू असतना विशेषतज्ञ डॉक्टरांअभावी रुग्णांना इतरत्र धाव घ्यावी लागते. रुग्णालयातील रिक्त पदाचे ग्रहण केव्हा सुटेल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. खामगाव हे घाटाखालील जिल्ह्याचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाते. येथे महात्मा ज्योतीबा फुले यांच्या नावाने सामान्य रुग्णालय ओळखल्या जाते. शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते आहे. त्याचबरोबर सर्पदंश, विषबाधा, जळीत रुग्ण व इतर गंभीर स्वरुपाच्या आजाराचे रुग्ण उपचाराकरिता येत असतात. घाटाखालील नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव या तालुक्यातील रुग्णांची धाव असते. २३३ खाटांची सुविधा असलेल्या या रुग्णालयात दररोज ४00 रुग्णांची बाह्य रुग्ण तपासणी केली जाते. महिलांच्या प्रसुतीचे प्रमाणही महिन्याकाठी ३५0 ते ४00 च्या जवळपास आहे. २४ तास कार्यरत राहणारे ट्रामा केअर युनिट कार्यरत आहे. मात्र डॉक्टरांअभावी रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. परिणामी अकोला रेफरचे प्रमाण वाढले आहे. सद्यस्थितीत सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी वर्ग १ ची १५ पदे मंजूर असताना केवळ ५ अधिकारीच कार्यरत आहेत. १0 पदे रिक्त आहेत. यामध्ये विशेषतज्ञांची कमतरता आहे. वैद्यकीय अधिकारी वर्ग २ च्या २0 पदांची मंजुरात असून १0 पदे रिक्त तर १0 अधिकारी कार्यरत आहेत. यासोबतच औषध निर्माण अधिकारी, परिचारिका, सहाय्यक अधिसेविका, वॉर्डबॉय, पॅथॉलॉजीस्ट यांचीही काही पदे रिक्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून सामान्य रुग्णालयाचा चेहरा बदलविण्याचा प्रयत्न चालू आहे. उपलब्ध कर्मचार्‍यांमध्ये आयसीयु विभाग, अत्याधुनिक नवजात शिशू कक्ष, सिकलसेल तसेच डायलेसीस रुग्णांना सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. मात्र अधिकार्‍यांअभावी पुरेशी सेवा देण्यास अडचण निर्माण होत आहे. राजीव गांधी जिवनदायी योजनेत खामगाव सामान्य रुग्णालयाचा उपचारासाठी समावेश आहे. परंतु येथे येणार्‍या रुग्णांना वेळेवर पाहिजे तो उपचार मिळेलच याची शाश्‍वती नाही. अधिकार्‍यांच्या कमतरतेमुळे जिवनदायी आरोग्य योजना कोंडीत सापडली आहे. त्यामुळे रिक्त असलेली वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे तात्काळ भरण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: 15 posts of medical officers vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.