नायपर परीक्षेत अनुराधा फार्मसीचे १५ विद्यार्थी झळकले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:52+5:302021-07-17T04:26:52+5:30

औषधनिर्माणशास्त्र विद्याशाखेत संशोधनासाठी कार्यरत असलेल्या (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च) या राष्ट्रीय पातळीवरील ‘नायपर’ स्पर्धा परीक्षेत अनुराधा ...

15 students of Anuradha Pharmacy shine in Naipur exam! | नायपर परीक्षेत अनुराधा फार्मसीचे १५ विद्यार्थी झळकले!

नायपर परीक्षेत अनुराधा फार्मसीचे १५ विद्यार्थी झळकले!

Next

औषधनिर्माणशास्त्र विद्याशाखेत संशोधनासाठी कार्यरत असलेल्या (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च) या राष्ट्रीय पातळीवरील ‘नायपर’ स्पर्धा परीक्षेत अनुराधा औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे ज्ञानेश्वर ढोले, ऋषिकेश सुरडकर, आकाश शेळके, सय्यद नदीम, सय्यद करीम, केशव ताठे, गणेश कुटे, सूरज ठाकरे, विशाल पिंपळे, तुषार जाधव, अंकिता महाडिक, संतोष जायभाये, शुभम जाधव, आरती भिलावेकर, योगेश आल्हाट, बळीराम भुतेकर या विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून, पदव्युत्तर पदवी एम.एस. (मास्टर ऑफ सायन्स) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचा मार्ग सुकर केला आहे. या परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी व्हॅलिड ‘जी पॅट’ स्पर्धा स्कोअर किंवा बी.फार्म. पदवी परीक्षेत ६० टक्के गुणांसह किंवा बी.फार्म. पदवी परीक्षेचा ६.७५ सीजीपीए असणे आवश्यक आहे. भारतामध्ये ‘नायपर’ या राष्ट्रीय परीक्षेसाठी सुमारे ८२० जागा भरल्या जातात. ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, तसेच शिक्षणानंतर नामांकित ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध होते.

यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत महाविद्यालयातील १५ विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे, संस्थेचे सचिव तथा माजी आमदार राहुल बोंद्रे, उपाध्यक्ष डॉ. व्ही.आर. यादव, विश्वस्त सिद्धेश्वर वानेरे, सलिमोद्दीन काझी, आत्माराम देशमाने, अनंतराव सराफ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.आर. बियाणी, प्राचार्य डॉ. आर.एच. काळे, प्राचार्य डॉ. आर.आर. पागोरे, प्रा. सूरज सगरुळे, प्रा. एकनाथ कोळे, प्रा. पवन फोलाने यांच्यासह प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी छोटेखानी कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा गौरव केला आहे.

Web Title: 15 students of Anuradha Pharmacy shine in Naipur exam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.