कर्जमाफीच्या ऑथेंटीकेशनसाठी १५०० बायोमेट्रीक यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 03:21 PM2020-02-12T15:21:08+5:302020-02-12T15:21:17+5:30

कर्जाचा आकडा आणि आधारक्रमांक बरोबर आहे किंवा नाही याची पडताळणी करून सेतू केंद्रावर बायोमॅट्रीक पद्धतीने आॅथेंटीकेशन द्यावे लागणार आहे.

1500 Biometric Devices for Authentication of Debt Waiver | कर्जमाफीच्या ऑथेंटीकेशनसाठी १५०० बायोमेट्रीक यंत्र

कर्जमाफीच्या ऑथेंटीकेशनसाठी १५०० बायोमेट्रीक यंत्र

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत १५ फेब्रुवारीनंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची माहिती ही पोर्टलवर छळकणार असून २२ फेब्रुवारी पासून शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाचा आकडा आणि आधारक्रमांक बरोबर आहे किंवा नाही याची पडताळणी करून सेतू केंद्रावर बायोमॅट्रीक पद्धतीने आॅथेंटीकेशन द्यावे लागणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात तब्बल एक हजार ५०० बायोमॅट्रीक यंत्र उपलब्ध आहेत. सोबत जिल्हा केद्रीय सहकारी बँकच्या जवळपास ५३ शाखांवरही हे यंत्र उपलब्ध करण्यात आले आहे.
शनिवार १५ फेब्रुवारी पर्यंत शेतकºयांच्या कर्जखात्याची माहिती, आधार क्रमांकाची माहिती ही पोर्टलवर अपलोड करावयाची असून ११ फेब्रुवारी पर्यंत कर्जमाफी झालेल्या जिल्ह्यातील एक लाख ९५ हजार ३११ शेतकºयांपैकी एक लाख ८४ हजार ६७६ शेतकºयांची माहिती अपलोड झाली आहे. जिल्ह्यात जवळपास एक हजार ४०० कोटी रुपायांची कर्जमाफी ही एक लाख ९५ हजार ३११ शेतकºयांना मिळणार आहे. त्यादृष्टीने सध्या यंत्रणा कार्यरत आहे.
याद्या अपलोड झाल्यानंतर त्या पोर्टलवर झळकतील. सोबतच गाव पातळीवरही त्या तलाठी कार्यालयात लावण्यात येतील. तेथील युनीक आयडी क्रमांक, कर्जाची रक्कम आणि आधार क्रमांक योग्य असल्यास सेतू केंद्रावर जावून आॅथेंटीकेशन द्यावयाचे आहे. जर यात चुक असले किंवा माहिती योग्य नसले तर तसा पर्याय नोंदवावा. त्यामुळे संबंधीत शेतकºयांची तक्रार आॅनलाईन पद्धतीने शेत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे जाईल व तेथे समस्यांचे निराकरण केले जाईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी रामेश्वर पुरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

Web Title: 1500 Biometric Devices for Authentication of Debt Waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.