लोणार तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या १५०० वर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:35 AM2021-04-07T04:35:24+5:302021-04-07T04:35:24+5:30

तालुक्यात आतापर्यंत वर्षभरात एकूण २२ हजारांवर कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून, यातील जवळपास १२००० चाचण्या गेल्या ६५ दिवसांत केल्या ...

1500 corona patients in Lonar taluka! | लोणार तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या १५०० वर !

लोणार तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या १५०० वर !

Next

तालुक्यात आतापर्यंत वर्षभरात एकूण २२ हजारांवर कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून, यातील जवळपास १२००० चाचण्या गेल्या ६५ दिवसांत केल्या गेल्या आहेत हे विशेष! यामध्ये एकूण १५०४ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी १२ व्यक्ती कोरोनामुळे मृत्युमुखी पडल्या असून, आजरोजी ३२५ कोरोनाबाधित स्थानिक आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत, तर ११५० कोरोनाबाधित उपचार घेऊन पूर्ण बरे झाले असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे. विशेष म्हणजे गेल्या ६० दिवसांत ९०० बाधित व्यक्ती आढळून आल्यानंतरही स्थानिक आरोग्य यंत्रणेने रात्रंदिवस केलेल्या मेहनतीमुळे केवळ दोन व्यक्ती कोरोनाच्या बळी ठरल्या असून, इतर रुग्ण या आजारातून पूर्ण बरे झाल्याचे चित्र दिसते आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणा तसेच लोणार कोविड केअर सेंटरवर कार्यरत डॉक्टर, इतर वैद्यकीय कर्मचारी यांच्या कार्यतत्परतेमुळे मृत्युदर नियंत्रणात आहे; परंतु नागरिकांची कोरोना नियमावलींना फाटा देणारी वृत्ती तालुक्यातील कोरोना रुग्णवाढीस पोषक ठरते आहे ही एक चिंतेची बाब प्रशासनासमोर आहे. स्थानिक नगर परिषद, महसूल, पोलीस, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी झटत असताना जनतेकडून मात्र पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांत प्रशासनाने कोरोना नियमावली न पाळणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईचा बडगा उगारल्याशिवाय तालुक्यातील कोरोना आटोक्यात येणार नाही, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

बाॅक्स

लोणार तालुक्यातील कोरोनाची स्थिती

एकूण चाचण्या २२१०४

एकूण रुग्ण १५२०

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण ३२९

एकूण मृत्यू - १२

कोट

लोणार येथील कोविड सेंटरवर २४ तास कोरोना चाचण्या सुरू असतात. त्यामुळे कोरोना रुग्णाचे लवकर निदान होण्यास मदत होते आणि रुग्णास लवकर उपचार मिळत असल्याने मोठी रुग्णसंख्या असूनही मृत्युदर नियंत्रणात आहे.

डाॅ. भास्कर मापारी, व्यवस्थापक, कोविड सेंटर, लोणार

Web Title: 1500 corona patients in Lonar taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.