बुलडाणा तालुक्यात १५१ पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:35 AM2021-04-16T04:35:23+5:302021-04-16T04:35:23+5:30
चिखली तालुक्यात सर्वाधिक रुग्ण चिखली : गत काही दिवसापासून शहरासह ग्रामीण भागात काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे़ गुरुवारी चिखली ...
चिखली तालुक्यात सर्वाधिक रुग्ण
चिखली : गत काही दिवसापासून शहरासह ग्रामीण भागात काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे़ गुरुवारी चिखली शहर आणि तालुक्यातील १५७ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे़ काेराेना रुग्णांची संख्या वाढत असली तरी ग्रामस्थांमध्ये गांभीर्य नसल्याचे चित्र आहे़
संग्रामपुरात काेराेना संसर्ग वाढताेय
बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेती़ मात्र, गुरुवारी १४ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे़ आतापर्यंत संग्रामपूर तालुक्यात काेराेना बाधितांची संख्या कमी हाेती़
विवाह साेहळ्यात २५ लाेकांनाच परवानगी
बुलडाणा : वाढता काेराेना संसर्ग पाहता प्रशासनाने ब्रेक द चेनअंतर्गंत कडक निर्बंध लावले आहेत. याअंतर्गंत विवाह साेहळ्याला २५ लाेकांनाच परवानगी देण्यात आली आहे़ तसेच अंत्यसंस्कारासाठी २० लाेकांनाच उपस्थित राहता येणार आहे़
त्या दुकानदारांना लसीकरण आवश्यक
बुलडाणा : ब्रेक द चेनअंतर्गंत जिल्हाभरात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत़ याअंतर्गंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी, दुकानदार व तेथील कामगारांना काेराेनाची लस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे़ तसेच दुकानदारांना काेराेनाविषयक नियमांचे पालन करावे लागणार आहे़
प्रत्येक फेरीनंतर वाहने हाेतील निर्जंतूक
बुलडाणा : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लावले असले तरी सार्वजिनक वाहतुकीला मात्र सूट देण्यात आली आहे़ सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांचे प्रत्येक फेरीनंतर निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे़
रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण वाढले
बुलडाणा : मार्च महिन्यापासून जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ जिल्ह्यातील काेराेना रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ८७़़ ८३ टक्क्यांवर पाेहचले आहे़ त्यामुळे प्रशासनाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे़
शासकीय कार्यालयात ५० टक्केच कर्मचारी
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना संसर्ग राेखण्यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले असले तरी, शासकीय कार्यालये सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे़ या कार्यालयामध्ये ५० टक्केच कर्मचारी उपस्थित राहणार आहेत़