१५४ कुटुंबाचे सावरले संसार!

By Admin | Published: April 1, 2017 02:04 AM2017-04-01T02:04:19+5:302017-04-01T02:04:19+5:30

कौटुंबिक हिंसाचाराचे वाढते प्रमाण; महिला जागृती संस्थेचा पुढाकार.

154 family rejuvenated! | १५४ कुटुंबाचे सावरले संसार!

१५४ कुटुंबाचे सावरले संसार!

googlenewsNext

उद्धव फंगाळ
मेहकर, दि. ३१- मेहकर येथील महिला जागृती संस्थेच्यावतीने चालविल्या जाणार्‍या महिला समुपदेशन कक्षाने मागील वर्षभरात जवळपास १५४ कुटुंबातील निर्माण झालेले वाद-विवाद दूर करून त्यांचे संसार जुळविण्याचे काम केले आहे.
ह्यअसं म्हणतात.. संसार म्हटलं की, भांड्याला भांडं लागतच.ह्ण म्हणजे दैनंदिन जीवन जगत असताना संसारामध्ये लहान-मोठे वाद-विवाद, वितुष्ठ निर्माण होतातच. त्यातूनच चांगल्या संसाराची घडी विस्कळीत होते. छोट्या-मोठय़ा कारणांनी तणाव वाढतो. हे वाद विकोपाला जावून पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण होऊन मग प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंंंत जाते; मात्र या छोट्या-छोट्या चुकांमुळे कायमची ताटातूट न करता एकमेकांना समजावून घेऊन पुन्हा संसाराची गाडी रुळावर आनण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला महिला कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. अलीकडे महिलांवरील अन्याय- अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्याच बरोबर कौटुंबिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊन वेळप्रसंगी या वादाचे रुपांतर मोठय़ा भांडणात होते. त्यानंतर पोलीस स्टेशन, कोर्ट-कचेरीपर्यंंंत ही भांडणे जाऊन पोहोचतात. लग्नानंतर आपले आयुष्य सुखी व समृद्धीचे जावे, पती, मुलंबाळ, नातेवाईक यांनासुद्धा आपल्याकडून काही त्रास होऊ नये, असे जवळपास सर्वच महिलांना वाटत असते; मात्र जस-जसे संसारिक जीवनाला सुरुवात होते. तस-तसे घरामध्ये किरकोळ वादाला सुरुवात होते, यामुळे संसारिक जीवन हे विस्कळीत होते. या वादाला व घरात निर्माण होणार्‍या वादाला कारणे अनेक असली, तरी सध्या वाढत्या व्यसनाधीनतेचाही मोठा वाटा या वादाला करणीभूत आहेच. अलीकडे युवा पिढी व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे अशा व्यसनामुळे अनेकांचे कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त होत आहेत.

Web Title: 154 family rejuvenated!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.