बुलडाणा जिल्ह्यासाठी १,५५० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 11:55 AM2021-04-29T11:55:21+5:302021-04-29T11:55:37+5:30
Crop Loan in Buldhana District: बँकांनी तयारी केली असून काही ठिकाणी पीक कर्ज वाटपास प्रारंभ झाला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
बुलडाणा : खरीप हंगामाच्या दृृष्टीने शेतकऱ्यांनी शेती मशागतीस प्रारंभ केल्याच्या पार्श्वभूमीवर वार्षिक पत आराखड्यांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील १ लाख ७० हजार शेतकऱ्यांना यंदा १,५५० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे बँकांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. दरम्यान खरिपासाठी १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १ हजार ३०० कोटी रुपयांचे तर रब्बी हंगामासाठी ३० हजार शेतकऱ्यांना २५० कोटी रुपये पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सध्या पीक कर्ज वाटपास बँकांनी प्रारंभ केला असून सातबारा, आठ अ, आधारकार्ड, पॅनकार्ड या कागदपत्रांची शेतकऱ्यांना पूर्तता केल्यानंतर पीक कर्ज वाटप करण्यात येणार आहे. दरम्यान एक लाख रुपयांच्या पीक कर्जासाठी शेतकऱ्याला १०० रुपयांचा एक बॉन्ड आवश्यक राहणार आहे. नवीन खातेदार असल्यास त्यास फेरफार ही सोबत द्यावा लागेल, असे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान ३१ जुलै ही पीक कर्ज वाटपाची अंतिम तारीख राहणार आहे. साधारणत: मे महिन्याच्या प्रारंभापासून शेतकरी पीक कर्ज घेण्यास प्रारंभ करतात. त्यानुषंगाने बँकांनी तयारी केली असून काही ठिकाणी पीक कर्ज वाटपास प्रारंभ झाला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.