१५७ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:15 AM2021-05-04T04:15:28+5:302021-05-04T04:15:28+5:30
देऊळगाव मही, मलग रस्त्याची होणार सुधारणा देऊळगाव मही : प्रमुख जिल्हा मार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधी मंजूर करण्यात आलेला ...
देऊळगाव मही, मलग रस्त्याची होणार सुधारणा
देऊळगाव मही : प्रमुख जिल्हा मार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये मलगी, इसरूळ, देऊळगाव मही या ३० किमी रस्त्याच्या सुधारणेसाठी ३ कोटी रुपयापर्यंत निधीला मान्यता देण्यात आलेली आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग देऊळगाव राजा अंतर्गत मार्च २०२१ मध्ये अर्थसंकल्पीय कामामध्ये या रस्त्याच्या सुधारणा कामासाठी मान्यता देण्यात आली आहे.
सीबीएसईचा निकाल २० जूनला
बुलडाणा : सीबीएसई दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून, गुण वाटपाची जबाबदारी आता शाळांवर सोपविण्यात आलेली आहे. या परीक्षेचा निकाल २० जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या निकाल उत्सुकता लागलेली आहे.
आधारकार्ड नसल्याने अडचणी
बुलडाणा : सध्या कोरोना लसीकरणाची माेहीम वेगात सुरू आहे. परंतु या लसीकरणासाठी लाभार्थ्यांकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. त्यामुळे आधारकार्ड नसलेल्यांना लसीकरणासाठी नोंदणी करता येत नाही. परिणामी आधारकार्ड नसलेल्यांना लसीपासून वंचित रहावे लागत आहे.
पाणी विक्री घटली
मेहकर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने परिसरात पाणी विक्री घटल्याने दिसून येत आहे. दुकाने, हॉटेल, बंद असल्यानेही पाण्याची कॅन विकत घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. त्यामुळे पाणी विक्रेत्यांना फटका बसला आहे.
अवकाळी पावसाचा फटका
डोणगाव : परिसरात काही गावांना रविवारच्या रात्रीदरम्यान अवकाळी पावसाचा फटका बसला. त्यामुळे शेतात असलेल्या फळबागा व भाजीपाला वर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रविवारी सायंकाळपासून वादळी वाऱ्याला सुरूवात झाली होती.
कर वसुलीसह कोरोना जनजागृती !
बुलडाणा : जिल्ह्यातील नगरपालिकांकडून १०० टक्के कर वसुलीसाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. सध्या कोरोनाची भीती नागरिकांमध्ये असल्याने पालिका कर्मचारी कर वसुली सोबतच कोरोनाबाबत जनजागृती करताना दिसून येत आहेत.
झुडपी जंगलाचे प्रमाण दहा टक्क्यांवर
बुलडाणा : पश्चिम वऱ्हाडात २० हजार २३५ चौ. किमी क्षेत्र हे जंगलांनी व्यापले असले तरी त्यातील १० टक्के वनक्षेत्र हे झुडपी जंगल म्हणून गणल्या जात आहे. प्रामुख्याने विदर्भामध्ये झुडपी जंगलाचे प्रमाण अधिक असून बुलडाणा जिल्ह्यात १६२ चौ. किमी क्षेत्रावर झुडपी जंगल आहे.
औद्योगिक उत्पादन निर्देशकांसाठी वेब पोर्टल
बुलडाणा : राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे अनावरण ऑनलाईन पद्धतीने पार पडले. जिल्ह्यामधील निवडलेल्या ५६८ कारखान्यांकडून दरमहा विहीत कालावधीत माहिती या वेब पोर्टलवर नोंद करण्याची जबाबदारी उद्योग संचालनालयाच्या महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांच्यावर देण्यात आली आहे.
पाणंद रस्त्याच्या दुरस्तीची गरज
किनगावराजा : हिवरखेड ते बारलिंगा हा गावाकडील पाणंद रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. बारलिंगा, खैरव, टाकरखेड येथून येणारे बरेच नागरिक या रस्त्याने किनगावराजाकडे बाजारपेठेसाठी येत असतात. या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने शेतकऱ्यांसह या सर्व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
कांदा बीजोत्पादन काढणीला
मेहकर: तालुक्यातील कोराडी प्रकल्प शंभर टक्के भरला होता. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह उन्हाळी पीक पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. रब्बी हंगामात हिवरा आश्रम शिवारात प्रगतशील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील बीजोत्पादन कांदा लागवड केली आहे. अनेकांचा कांदा बीजोत्पादन काढणीला आलेला आहे.
बाजार स्थगित केल्याने नागरिकांची तारांबळ
डोणगाव : येथील बुधवारी भरणारा आठवडे बाजार स्थगित करण्यात आल्याने भाजीपाला विक्रेते व व्यावसायिकांसह नागरिकांची तारांबळ उडाली. बाजारात शुकशुकाट दिसून येत आहे. हातगाडीवर भाजीपाला ठेवून गावात घरोघरी विकावा लागत आहे.
एसटी महामंडळाचे नुकसान
बुलडाणा : येथील आगारामधून जाणाऱ्या खामगाव, मेहकर, चिखली बसेसाठी प्रवाशी मिळत नसल्याने एसटी महामंडळाचे मोठे नुकसान होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लाॅकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे एसटी बसने प्रवासी जात नाहीत.