जुगार खेळणाऱ्या १६ जणांना अटक, १० लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:33 AM2021-03-28T04:33:04+5:302021-03-28T04:33:04+5:30
बुलडाणा येथील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांना साखरखेर्डा येथील विष्णू सुधाकर गायकवाड यांच्या शेतातील बखारीवर जुगार खेळत ...
बुलडाणा येथील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांना साखरखेर्डा येथील विष्णू सुधाकर गायकवाड यांच्या शेतातील बखारीवर जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. साखरखेर्डा येथील पोलीसस्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे आणि गुन्हे शाखेचे पीएसआय प्रदीप आढाव, पीएसआय नीलेश शेळके, पीएसआय श्रीकांत जिद्मवार, पोलीस हेडकाॅन्स्टेबल रामदास वैराळ, प्रकाश मुंढे, राजू मापारी, चांदूरकर, आहेर, मेहर, सोनुने, चिंचोले, मगर, गोरले, वाघमारे, चालक बर्डे, चालक भिसे या पथकाने विष्णू गायकवाड यांच्या शेतातील बखारीवर छापा टाकला असता तेथे जुगार खेळत असताना आढळून आले. पोलिसांनी विष्णू सुधाकर गायकवाड, शुभम दिलीपसिंग दभैये, प्रवीण आसाराम पाझडे, ऋतीक मोतीराम गायकवाड, अमजतखान, आमानउल्ला खान, शे. आरीफ शेख कादर, अब्रार शहा फकरू शहा, ब्रह्मानंद सुधाकर गायकवाड (सर्व रा. साखरखेर्डा), किसन आत्माराम अवचार आणि श्रीकृष्ण राजू गवई (रा. वडगावमाळी), विलास रमेश पऱ्हाड (रा. सिंदखेडराजा), राजू मुरलीधर दहातोंडे (रा. लोणार), ॠषीकेश अभिमन्यू मुळे (रा. उदमापूर), सुभाष भास्कर मुळे (रा. उदमापूर), संतोष लक्ष्मण आंभोरे (रा. बोरखेडी), राजू सुखलाल बशिरे (रा. अंजनी खुर्द) या १६ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याजवळून नगदी ४२ हजार ४०० रुपये, सात मोटारसायकली, एक बोलेरो, १५ मोबाइल, तास पत्ता असा एकूण १० लाख पाच हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्व आरोपींवर मुंबई जुगार ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल रामदास वैराळ करीत आहेत.