बुलडाणा जिल्ह्यातील १६ प्रकल्पांना बाष्पीभवन मापक यंत्रांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 11:01 AM2021-08-07T11:01:16+5:302021-08-07T11:01:51+5:30

Buldhana News : १६ प्रकल्पांवर बाष्पीभवन मापक यंत्र बसविण्याचे पाच वर्षापूर्वी निर्देश देण्यात आले होते.

16 projects in Buldana district waiting for Evaporation gauge | बुलडाणा जिल्ह्यातील १६ प्रकल्पांना बाष्पीभवन मापक यंत्रांची प्रतीक्षा

बुलडाणा जिल्ह्यातील १६ प्रकल्पांना बाष्पीभवन मापक यंत्रांची प्रतीक्षा

googlenewsNext

- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: प्रकल्पांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून एक हजार हेक्टरपेक्षा अधिक सिंचनक्षमता असलेल्या १६ प्रकल्पांवर बाष्पीभवन मापक यंत्र बसविण्याचे पाच वर्षापूर्वी निर्देश देण्यात आले होते. मात्र पाच वर्षानंतरही त्यासंदर्भातील अंमलबजावणी झाली नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील प्रकल्पांमधील जवळपास ३० टक्के पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचे १५ वर्षापूर्वी करण्यात आलेल्या एका अभ्यासात स्पष्ट झाले होते.
त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील १६ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांवर हे यंत्र बसविण्यासंदर्भात २०१७ मध्ये हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र अद्यापही त्या पूर्णत्वास गेलेल्या नाही. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेकडे (मेरी) निधीही जमा करण्यात आलेला आहे. मात्र प्रत्यक्षात याची अंमलबजावणी झालेली नाही. मेरीच्या मार्गदर्शक तत्वानुसार हे बाष्पीभवन मापक यंत्र प्रकल्पांवर लावण्यात येणार आहेत. हवामानातील बदल, वाढते उष्णातामान आणि अपघाव पद्धतीने पडणारा पाऊस पाहता पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाच्या पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन व्हावे या दृष्टिकोनातून या हालचाली सुरू झाल्या होत्या. 
राज्य शासनाने यासंदर्भात विदर्भ पाटबंधारे विकास मंडळालाही त्यावेळी पत्र पाठवले होते. पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पावर या सुविधा आहेत. मात्र आपल्याकडे त्या नाहीत, असे सुत्रांनी  स्पष्ट केले. 
यंदाच्या पावसाळ्यातील दोन महिन्यात जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अपेक्षित जलसाठा झालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता ही बाब समोर आली. 


या प्रकल्पांचा होता समावेश
जिल्ह्यातील नळगंगा, ज्ञानगंगा, कोराडी, पलढग, मस, मन, तोरणा, उतावळी, मांडवा, व्याघ्रा नाला, बोरखेडी, डोरपगाव, मासरूळ, विद्रूपा, करडी, ब्राम्हणवाडा या प्रकल्पावर हे यंत्र बसविण्यात येणार होते. नळगंगा प्रकल्पावर पूर्वी ते बसविण्यात आले होते. मात्र ते नादुरुस्त झाल्याने त्याचाही यामध्ये समावेश करण्यात आला होता. प्रकल्पांच्या भिंतीलगत, मोकळ्या जागेत जेथे उपद्रव होणार नाही अशा ठिकाणी सावलीत हे यंत्र लावण्यात येणार होते.

पाणीवापराचा अचूक अंदाज मिळेल
या यंत्रामुळे प्रकल्पातील जलसाठ्यापैकी प्रत्यक्षात किती पाण्याचे बाष्पीभवन होते याचे मोजदाद होऊन जलसाठ्याचे पिण्याच्या पाण्यासाठी, शेती सिंचनासाठी नियोजन करणे सोपे जाईल. जलसाठ्यातील जवळपास ३० टक्के पाण्याचे साधारणत: बाष्पीभवन होते. अलिकडील काळात वाढलेले तापमान पाहता हे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.  १५ वर्षापूर्वी याबाबत अभ्यास करण्यात आला होता.

Web Title: 16 projects in Buldana district waiting for Evaporation gauge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.