१७ टरबूज उत्पादक शेतक-यांना नुकसान भरपाई
By admin | Published: May 6, 2016 02:23 AM2016-05-06T02:23:54+5:302016-05-06T02:23:54+5:30
शेतक-यांच्या लढय़ाचा ‘लोकमत’ने प्रभावी पाठपुरावा केला.
संग्रामपूर (जि. बुलडाणा) : बोगस टरबूज बियाण्यांमुळे संग्रामपूर तालुक्यातील शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले. आधीच दुष्काळाने शेतकर्यांचे बेहाल असताना टरबुजाचे पीकही हातचे गेले. त्यामुळे शेतकर्यांनी बियाणे कंपनीविरोधात एल्गार पुकारला होता. शेतकर्यांचा हा लढा यशस्वी ठरला असून, कंपनीने त्यांना नुकसान भरपाई दिली आहे. शेतकर्यांच्या या लढय़ाचा ह्यलोकमतह्णने प्रभावी पाठपुरावा केला होता. जानेवारी महिन्यामध्ये नामधारी ७५0 कंपनीचे टरबूज बियाण्याची लागवड केली होती. मात्र हे बियाणे निकृष्ट निघाल्याने चार महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर ही या टरबुजाच्या वेलाला लागलेले फळेही पूर्णपणे भरले नाही. तसेच त्यांची वाढही खुंटली होती. या प्रकाराबाबत संबंधित शेतकर्यांनी ही बाब सदर कंपनीच्या डिस्ट्रीब्युटरकडे सांगितली. परंतु कंपनी डिस्ट्रीब्युटरने टोलवा टोलवीचे उत्तरे दिली. शेतकर्यांनी या प्रकाराबाबत जिल्हाधिकार्यांकडेही तक्रार केली. मात्र, त्याची दखल न घेतल्याने शेतकर्यांनी वेळोवेळी आंदोलने केली व या आंदोलनाचर्ी ह्यलोकमतह्णने वृत्त मालिका प्रकाशित केल्यामुळे अखेर कंपनीने या शेतकर्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन ४ एप्रिल रोजी या १७ शेतकर्यांना ५ हजार प्रतिएकरप्रमाणे बियाण्यांची नुकसानभरपाई दिली. लागवड करून ४ महिन्यांचा कालावधी झाल्यानंतरही या टरबुजाच्या वेलाला टरबूज न लागल्याने तसेच वेलाला लागलेल्या फळांचा दर्जा व आकारमानावर फरक पडल्यामुळे या फळाचे वजन २00 ते ४00 ग्रॅमच भरत होते व या फळाचा आकार गोल नसल्यामुळे संबंधित शेतकर्यांनी नामधारी ७५0 कंपनीकडून नुकसानभरपाई द्यावी, याकरिता रिजनल मॅनेजरकडे मागणी केली होती. तसेच तालुका कृषी अधिकारी यांचेकडे सुध्दा टरबूज बियाणे बोगस निघाल्याची तक्रार केली होती. यानंतर शेतकरी तक्रार निवारण समितीने बियाणे बोगस व सदोष असल्याचा अहवालही दिला होता. परंतु कंपनीकडून नुकसानभरपाई मिळत नव्हती.