स्मार्ट ग्राम योजनेसाठी १७ ग्रामपंचायतींची तपासणी

By Admin | Published: February 7, 2017 02:55 AM2017-02-07T02:55:42+5:302017-02-07T02:55:42+5:30

आचारसंहितेनंतर निकाल घोषित; योजनेत ६६ ग्रामपंचायतींनी घेतला सहभाग.

17 gram panchayat checks for smart village scheme | स्मार्ट ग्राम योजनेसाठी १७ ग्रामपंचायतींची तपासणी

स्मार्ट ग्राम योजनेसाठी १७ ग्रामपंचायतींची तपासणी

googlenewsNext

हर्षनंदन वाघ
बुलडाणा, दि. ६-लोकसहभागातून गावाचा सर्वांंगीण विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेत तालुक्यातील सर्व ६६ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. त्यापैकी २५ टक्के म्हणजे १७ ग्रामपंचायतींची मोताळा येथील मूल्यमापन समितीने तपासणी करून पंचायत समितीकडे अहवाल सादर केला आहे. या अहवालाच्या आधारे तालुक्यातून प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीचा निकाल निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर घोषित करण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त लोकसहभागातून गावकर्‍यांबरोबरच संबंधित पंचायतींना स्वयंपूर्ण करण्यासाठी इको व्हिलेज योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने स्मार्ट ग्राम योजना हा उपक्रम हाती घेतला आहे. या योजनेत संबंधित ग्रामपंचायतींच्या कार्यकक्षेतील गावांची सार्वजनिक स्वच्छता, गावाची पाणीपुरवठा योजना, पाणी व्यवस्थापन, पंचायतींची विविध करांची वसुली, अंगणवाड्या, शाळांची सजावट, ग्रामसभा, ग्रामसभेतील विविध विकासात्मक ठराव, गावातील विकासाच्या योजना अशी वेगवेगळी उपक्रमे राबवायची आहेत. याशिवाय वृक्षारोपण, वृक्षसंगोपन या उपक्रमांचाही समावेश आहे. इको व्हिलेजच्या धर्तीवर ही योजना असली तरी इको व्हिलेज केवळ वृक्षारोपणापुरतीच र्मयादित आहे. तथापि, या स्मार्ट ग्रामयोजनेत लोकसहभागातून गावाचा सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे.

गावाला मिळणार १0 लाखांचे बक्षीस
ग्रामीण खेडे स्वयंपूर्ण होण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या स्मार्ट ग्राम योजनेत तालुक्यातून पहिल्या आलेल्या ग्रामपंचायतीस शासनातर्फे १0 लाखांचे प्रथम बक्षीस देण्यात येणार आहे. त्यासाठी निर्धारित केलेल्या १00 गुणांचे मूल्यांकन करण्यात आले. सुरुवातीस ग्रामपंचायत स्वत: गुणांचे मूल्यांकन करेल. त्यानंतर दुसर्‍या तालुक्यातील नेमलेली समिती मूल्यांकन करेल. जास्तीत जास्त गुण प्राप्त करणारी ग्रामपंचायत या बक्षिसास पात्र ठरून तिची जिल्हास्तरावर निवड करण्यात येईल. जिल्ह्यात प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीस ४0 लाखांचे बक्षीस मिळणार आहे. गावांच्या विकासासाठी शासनाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला असला तरी, ही योजना प्रभावी व नियोजनबद्ध राबविण्याची गरज आहे.

Web Title: 17 gram panchayat checks for smart village scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.