हरवलेल्या १७ बालकांचा शोध!
By admin | Published: July 2, 2017 09:05 AM2017-07-02T09:05:14+5:302017-07-02T09:05:14+5:30
हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी १ ते ३१ जुलै दरम्यान ‘आॅपरेशन मुस्कान -३’ राबविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी १ ते ३१ जुलै दरम्यान ह्यआॅपरेशन मुस्कान -३ह्ण राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्याच दिवशी बुलडाणा एलसीबी पथकाने शेगाव येथे हरवलेल्या तब्बल १७ बालकांचा शोध लावला. त्यामुळे एलसीबी पथकाला मोठे यश मिळाले आहे.
अलीकडे लहान मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी राज्यात ह्यआॅपरेशन मुस्कान-३ह्ण १ जुलैपासून प्रारंभ करण्यात आले. या अभियानांतर्गत बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेगाव येथील पोलीस स्टेशनला येवून रेकॉर्डवरील हरवलेल्या मुलांचा शोध घेतला. यामध्ये पाच मुली व एक मुलगा आढळून आला. तसेच गजानन महाराज मंदिर परिसरात चार मुली व सात मुले असे एकूण ११ जणांचा शोध घेण्यात आला. त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक शशीकुमार मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली एएसपी संदीप डोईफोडे, पोलीस निरीक्षक प्रतापसिंग शिकारे, पी.एस.इंदोडे, बालसंरक्षण अधिकारी शहानवाज खान, पीएसआय शेषराव अंभोरे, नापोकाँ गजानन चतुर, विलास काकड, अविनाश जाधव, कल्पना हिवाळे, चालक पोहेकाँ विजय उमाळे यांच्या पथकाने केली.