१७ देवस्थानांना तीर्थक्षेत्राचा दर्जा
By admin | Published: February 8, 2016 02:19 AM2016-02-08T02:19:05+5:302016-02-08T02:19:05+5:30
बुलडाणा जिल्हय़ातील १७ देवस्थानांना तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.
खामगाव: बुलडाणा जिल्हय़ातील १७ देवस्थानांना तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. दरम्यान, येत्या काळात जिल्ह्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुषंगाने अल्पावधीतच जिल्ह्यात एक कोटी ३0 लाख रुपयांची कामे करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात क दर्जा प्राप्त ४६९ तीर्थस्थळे आहेत. त्यांच्या विकासासाठीही प्रयत्न करणे सध्या गरजेचे झाले आहे. यात्रा स्थळांचा विकास करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद स्तरावर आता प्राधान्याने प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली आहे. २0१५-१६ हे आर्थिक वर्ष संपुष्टात येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील ४६९ तीर्थस्थळांच्या विकासासाठी ठोस उपाययोजना व तरतूद करण्याची गरज निर्माण झाली आहे. साधारणत: तीर्थस्थळांना अ व ब दर्जा राज्य शासनामार्फत दिल्या जातो. पर्यटन तथा तीर्थस्थळासाठीचा क दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव हा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडण्यात येऊन त्यावर अनुषंगीक कार्यवाही होते. त्यानुषंगाने यावर्षी जिल्ह्यातील १७ देवस्थांना तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.