१७३ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:32 AM2021-05-01T04:32:56+5:302021-05-01T04:32:56+5:30

सवडे कुटुंबीयांना अपघाती विम्याची रक्कम दुसरबीड : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व भारतीय स्टेट बँक अपघाती विमा योजनेंतर्गत चांगेफळ ...

173 Positive | १७३ पॉझिटिव्ह

१७३ पॉझिटिव्ह

Next

सवडे कुटुंबीयांना अपघाती विम्याची रक्कम

दुसरबीड : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व भारतीय स्टेट बँक अपघाती विमा योजनेंतर्गत चांगेफळ येथील सवडे कुटुंबीयांना २२ लाख रुपये अपघाती विम्याची रक्कम देण्यात आली. ज्ञानेश्वर सवडे यांचा ३० ऑगस्ट २०२० रोजी दुचाकी अपघातात मृत्यू झाला होता.

तूूर खरेदी सुरू होऊनही शेतकरी अडचणीत

बुलडाणा : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडअंतर्गत तूर खरेदी सुरू झालेली आहे. परंतु, अनेक नियम व अटींमुळे शेतकऱ्यांना तूरविक्री करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे नाफेडला तूरविक्री न करता व्यापाऱ्यांकडे मिळेल त्या भावात शेतकरी तूरविक्री करीत आहेत.

सिमेंट नाला बंधाऱ्याचे काम अपूर्ण

धाड : परिसरातील सिमेंट नाला बंधाऱ्याचे काम अपूर्ण आहे. जिल्ह्यात पडणाऱ्या कमी पावसामुळे सिंचनाचा प्रश्न गंभीर आहे. प्रत्येक गावात नदी, नाल्यांवर सिमेंट नाला बांध बांधले. परंतु, काही ठिकाणी हे काम अपूर्ण स्थितीत अडकले आहे.

स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची प्रतीक्षा

मेहकर : पाणीटंचाई असलेल्या गावांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. यासाठी ग्रामपंचायतीकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या अनुषंगाने अनेक योजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

नवीन विद्युतमीटरपासून ग्राहक वंचित

हिवरा आश्रम : नवीन विद्युतमीटरसाठी ग्राहकांनी अर्ज केलेले आहेत. परंतु, कित्येक महिने उलटूनही नवीन मीटर ग्राहकांना उपलब्ध करून दिले जात नसल्याने नवीन विद्युतमीटरपासून ग्राहक वंचित राहत आहेत.

प्लास्टिकचा सर्रास वापर

सुलतानपूर : शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. तरी येथे वापर सुरू आहे. या पिशव्यांचा सर्रास वापर होत असल्याचे दिसून येत आहे. कारवाई थंडावल्याने प्लास्टिकचा वापर वाढला आहे.

अमडापूर येथील मुख्य रस्त्यावर पडले खड्डे

अमडापूर : येथील जानेफळकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना गैरसोय सहन करावी लागत आहे. वाहनधारकांनाही त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे.

रस्त्यावरील धुळीमुळे नागरिक त्रस्त

बीबी : समृद्धी महामार्गावर मुरुमाची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे परिसरातील गावांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यावर धूळ पसरल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे. हवेमुळे धुळीचे कण वाहनधारकांच्या डोळ्यांत उडतात. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

लोणार, मेहकर मार्गाने रेतीची चोरटी वाहतूक

सुलतानपूर : लोणार ते मेहकर या मार्गाने रेतीची अवैध वाहतूक सुरू आहे. अंधाराचा फायदा घेत रात्री १० वाजेपासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत टिप्परची भरधाव वाहतूक सुरू असते. त्यामुळे रस्त्याची पूर्णपणे चाळणी झाली आहे. परिणामी, अपघातांच्या घटना वाढत आहेत.

जंतुनाशक फवारणीची गरज

धामणगाव बढे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दुबार जंतुनाशक फवारणी करण्याची गरज आहे. कोरोना खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीने फवारणी करण्याची आवश्यकता आहे. गावातील सर्वच भागांत ही फवारणी व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: 173 Positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.