खामगावातून १७५८ वारकरी पंढरपूरला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 03:29 PM2019-07-08T15:29:11+5:302019-07-08T15:29:38+5:30

पंढरीच्या वारीसाठी जाणाऱ्या भाविकांना घेऊन ‘विठ्ठल दर्शन’ एक्सप्रेस रविवारी सायंकाळी ५ वाजता खामगाव येथून रवाना झाली.

1758 Warkari leaves Khamgaon for Pandharpur | खामगावातून १७५८ वारकरी पंढरपूरला रवाना

खामगावातून १७५८ वारकरी पंढरपूरला रवाना

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : ‘पंढरीचे सुख नाही कोण्या धामा, नामाचा महिमा पंढरीशी’ असा भाव मनाशी बाळगून खामगाव येथून भाविक रविवारी पंढरपूरला रवाना झाले. पंढरीच्या वारीसाठी जाणाऱ्या भाविकांना घेऊन ‘विठ्ठल दर्शन’ एक्सप्रेस रविवारी सायंकाळी ५ वाजता खामगाव येथून रवाना झाली. यावेळी आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी गाडीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी भाजपा सोशल मिडीया सेलचे प्रदेश सदस्य सागर फुंडकर, भाजपा भाजपा तालुकाध्यक्ष शरदचंद्र गायकी, नगराध्यक्ष अनिता डवरे, भाजपा शहराध्यक्ष संजय शिनगारे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या गाडीने प्रवास करणाºया भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. विशेष म्हणजे १८ डब्यांच्या या गाडीतून गर्दीतही भाविकांनी पंढरीची वारी करणे पसंत केले. येणाºया १२ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे पांंडुरंगाला भेटण्याची ओढ लागलेल्या भाविकांची पाऊले पंढरपूरकडे वळु लागली आहेत. रेल्वे प्रशासनाच्या वतीने खामगाव येथून भाविकांसाठी विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावर्षी दोन फेºया भाविकांना पंढरीला घेऊन जाणार आहेत. यातील पहिली फेरी रविवारी रवाना झाली तर दुसरी फेरी १० जुलै रोजी दुपारी ४.२० वाजता जाईल. दरम्यान पहिल्या दिवशी ‘विठ्ठल दर्शन’ एक्सप्रेसने भाविकांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले. एकूण १८ डब्यांच्या या गाडीला जनरलचे ८, स्लीपरचे ८ व एसीचे २ डबे जोडण्यात आले. जनरलची प्रवाशी क्षमता ७२० प्रवाशी, एसीची १२८ तर स्लीपर डब्यांची क्षमता प्रवाशी ५७६ एवढी होती. १४२४ प्रवाशी क्षमता असलेल्या ‘विठ्ठल दर्शन’ एक्सप्रेसने तब्बल १७५८ भाविक पंढरपूरला गेले. गर्दीत सहभागी होण्याºया भाविकांचा उत्साह दिसला. ‘विठ्ठल दर्शन’ एक्सप्रेसने प्रवास करणाºया भाविकांसाठी तिकीटाचे दर जनरलमध्ये १९५ रूपये, रिजर्व्हेशनचे ४६५ रूपये तर एसी मधून प्रवास करण्यासाठी प्रतिव्यक्ती १२७५ असे आहेत. पहिल्या दिवशी रेल्वे प्रशासनाला ३ लाख ८९ हजार ८५५ रूपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती स्टेशन अधिक्षक पी.के. गुर्जर यांनी दिली.

माजी आमदारांकडून छत्र्यांचे वाटप
पंढरपूरला जाणाºया भाविकांना माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या वतीने छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार सानंदांनी भगवी टोपी देउन भाविकांचा सत्कार केला तसेच त्यांना फळांचे वितरणही यावेळी करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, सरस्वती खासने, सुरजितकौर सलुजा, कृ.उ.बा.स.सभापती संतोष टाले,माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर, तुषार चंदेल, न.प.कॉंग्रेस पक्षनेता अर्चना टाले, विजय काटोले आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: 1758 Warkari leaves Khamgaon for Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.