घरफोडीत १.७८ लाखांचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 12:50 PM2020-12-27T12:50:09+5:302020-12-27T12:50:21+5:30
Crime News पोलिसांनी २५ डिसेंबर रोजी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. शहरातील क्रीडा संकुल परिसरातील गुरुकृपानगरमध्ये एका घरातून अज्ञात चोरट्यांनी १.७८ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना २४ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी २५ डिसेंबर रोजी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
बुलडाणा शहरात गेल्या १५ ते २० दिवसांपासून घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सागवन परिसरात एका घरातून २.५० लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे प्रकरण समोर आलले असतानाच पुन्हा घरफोडी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात यापूर्वीही एका पोलीस कर्मचाऱ्याच्या दुकाचीवरील पिशवीतून दोन लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. या तीन घटना पाहता जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दरम्यान, गुरुकृपानगरमध्ये राहणारे अजय सुभाष भोपळे यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. यामध्ये ४० हजारांची सोन्याची पोत, ५० हजार रुपये किमतीचा सोन्याचा गोफ, ४५ हजा रुपयांच्या अंगठ्या व अन्य दागिने असा माल लंपास केला आहे. भोपळे यांच्या घर फोडून अज्ञात चोरट्यांनी दागिने लंपास केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव हे पुढील तपास करत आहेत. चोऱ्यांचा छडा लावण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.