१८ तास वीज गायब
By admin | Published: October 5, 2014 12:58 AM2014-10-05T00:58:23+5:302014-10-05T00:59:04+5:30
अनियमित विद्युतदाबामुळे सिंदखेडराजा तालुक्यातील विद्युत उपकरणे जळाली.
सिंदखेडराजा(बुलडाणा) : तालुक्यात सद्यस्थितीत २४ तासापैकी तब्बल १८ तास विद्युत गुल राहत असल्याने शे तीला कृषी पंपाच्या सहाय्याने पाणी देत असलेले शेतकरी हैराण झाले आहेत. विद्युत दाब कमीअधिक होऊन कृषीपंप तसेच विद्युत उपकरणे जळून नुकसान होण्याच्या घटनाही दररोज घडत आहेत. तालुक्यामध्ये १३ हजार कृषी पंपाचे अधिकृत ग्राहक आहेत. याव्यतिरिक्त अनेक व्यक्ती चोरुन वीज वापरतात ते वेगळेच. २५ वर्षापासून शासनकर्त्यांंनी विद्युत प्रकल्प उभे न केल्यामुळे व विजेचा वापर वाढल्यामुळे भारनियमनाच्या नावाखाली जनतेला वेठीस धरण्याचे प्रकार सध्या सुरु आहेत. दुसरबीड येथे १३२ के.व्ही.चे उपकेंद्र असून ११0 के.व्ही.वीज पुरवठा आहे. सिंदखेडराजा येथे ३३ केव्ही चे केंद्र असून त्यामध्ये २४ केव्ही वीजपुरवठा आहे. तर डावरगाव येथे ११ केव्हीचे केंद्र असून तेथे ७ केव्हीचा विजपुरवठा आहे. सद्यस्थितीत सोयाबीनसह कपाशी भुईमूंग, तूर व इतर पीके पावसाअभावी वाळायला लागली आहे. तालुक्यात केवळ ४ ते ६ तास वीज मिळत असून, त्यामध्येही विद्युतचा कमी जास्त दाब होणे नित्याचे झाले आहे. विद्युतच्या कमी अधिक दाबामुळे विद्युत रोहित्र, कृषी पंप यासह अनेक विद्युत उपकरणे जळत असल्याने शेतकर्यांचे नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील नशिराबाद, माळसावरगाव, सावखेड तेजन, अंचली यासह तालुक्यातील इ तर ठिकाणी सकाळी ६ वाजता विद्युत पुरवठा सुरु होतो. तर दुपारी १२ वाजता पुन्हा बंद केला जा तो. त्यानंतर दुसर्या दिवशीही हीच परिस्थिती राहत असून विद्युत मिळणार्या ६ तासात कमीअधिक दाब होणे सुरुच असते. या अवाजवी भारनियमनाने शहरवासियांसह शेतकरी हैराण झाले असून, ये थील विद्युत पुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
*सिंदखेडराजा शहराचे विद्युत बिल थकले
सिंदखेडराजा शहरामध्ये प्रत्येक महिन्याला १२ लाख रुपयाचे घरगुती विद्युत बिल येते. यातील ८0 टक्के विद्युत बिल महिन्याला भरणे आवश्यक असते. परंतु शहरवासींकडून यातील केवळ २७ ट क्केच बिल भरल्या जात असल्याने वीज वितरण कंपनीकडून भारनियमन केल्या जात आहे. त्यामुळे ज्यांच्याकडून नियमीत विद्युत बिल भरल्या जाते त्यांनाही भारनियमनाचा नाहक फटका बसतो.