१८ हजार दिव्यांगांना मिळाल्या सवलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2017 02:30 AM2017-03-17T02:30:01+5:302017-03-17T02:30:01+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती; दिव्यांगांना सावत्र वागणूक

18,000 Divorce Concessions | १८ हजार दिव्यांगांना मिळाल्या सवलती

१८ हजार दिव्यांगांना मिळाल्या सवलती

Next

बुलडाणा, दि. १६- दिव्यांगांचे हक्क, अधिकार आणि सेवा-सुविधा याबाबत शासन स्तरावर होणार्‍या या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. अशातच आता प्रशासनाच्यावतीनेही दिव्यांगांना सावत्रपणाची वागणूक मिळत आहे. त्यामुळेच पाच वर्षांंत केवळ १८ हजार दिव्यांगांना शासकीय सवलतीचा लाभ मिळू शकला आहे.
जिल्ह्यात गत पाच वर्षांंत नोंदविण्यात आलेली दिव्यांगांची संख्या १ लाख १८ हजार ७२३ आहे. मात्र आजपर्यंंत केवळ १८ हजार ९३४ दिव्यांगांनाच विविध शासकीय सवलतीचा लाभ मिळत आहे. २0१५ मध्ये ११९१ दिव्यांग आणि २0१६ मध्ये १७0७ दिव्यांग विविध सवलतीसाठी प्राप्त ठरले. त्यामुळे बरचे दिव्यांग अद्यापही शासकीय योजना व सवलतींपासून वंचित आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात अपंग पुनर्वसन केंद्र चालविले जाते. प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या बुधवारी अपंग बोर्डच्यावतीने येथे दिव्यांगांची तपासणी करून त्यांना दिव्यांग असल्याचे निश्‍चित करुन त्यांना दिव्यांगांचे प्रमाणपत्र देण्यात येते. येथून मिळणार्‍या दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना विविध योजनेचा लाभ मिळविता येते.
दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सकाळपासून जिल्हाभरातून आलेल्या लोकांची अपंग पुनर्वसन केंद्राच्या परिसरात गर्दी असते. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या अनुपस्थितीमुळे दिव्यांगांना तपासणी न करताच परत जावे लागते. शिवाय बर्‍याच वेळी आज नोंदणी झाल्यानंतर दिव्यांगाला कार्ड देण्यासाठी दोन वा तीन महिन्यानंतरची तारीख दिली जाते. यामुळे बर्‍याच दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळत नाही.
याबाबत दिव्यांगासाठी काम करणार्‍या विविध संस्था व संघटनांनी जिल्हा आरोग्य विभागाकडे पाठपुरवा केला. मात्र, आजही जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विविध समस्या कायम आहेत.

वर्षभरात ८५६ दिव्यांग अपात्र
जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात अपंग पुनर्वसन केंद्र चालविले जाते. यातून गेल्या वर्षभरात म्हणजे १ एप्रिल २0१६ ते १५ मार्च २0१७ पर्यंंंत १७0७ दिव्यांगांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यासाठी २२१९ अर्ज प्राप्त झाले होते. मात्र कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने ३४४ अपात्र ठरले. वैद्यकीय तपासणीत १७१ अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले.

Web Title: 18,000 Divorce Concessions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.