सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना १८ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 12:10 PM2020-09-26T12:10:35+5:302020-09-26T12:10:49+5:30

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºयांवर करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे.

18,000 fine for spitting in public places | सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना १८ हजारांचा दंड

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना १८ हजारांचा दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना संक्रमणाची वाढती व्याप्ती पाहता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना बुलडाणा पालिकेच्या पथकाने गेल्या सात दिवसात १८ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान मास्क न लावणे, संचारंदीचे उल्लंघन आणि शारीरिक अंतराचे पालन न केल्या प्रकरणीही गेल्या आठ दिवसात मोठ्या प्रमाणावर दंड आकारण्यात आला आहे.
एरेवी रस्त्यावर थुंकणाºयांकडे फारसे गांभिर्याने कोणी पाहत नव्हते. मात्र कोरोना संक्रमणाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºयांवर जुन्या कायद्याचा आधार घेत आता थेट कारवाई करण्यात येत आहे. अशा व्यक्तींकडून गेल्या सात दिवसात बुलडाणा पालिकेने १८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, तोंडाला मास्क न लावता फिरणाºयांवरही पालिकेने शहर परिसरात कारवाईचा बडगा उचलला असून अशांना ४३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पालिकेचे पथक सध्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सक्रीय झाले असून नियमांचे उल्लंघन करणाºयांवर थेट कारवाई करत आहे सार्वजनिक ठिकाणी थुंकणाºयांवर करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे.

Web Title: 18,000 fine for spitting in public places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.