एकाच दिवशी आढळले १८५ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्येने ओलांडला ३,५०० चा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 11:19 AM2020-09-04T11:19:47+5:302020-09-04T11:19:59+5:30
वर्तमान स्थितीत जिल्ह्यात १,०६० अॅक्टीव्ह रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एकूण रुग्ण संख्येने ३,५०० रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान गेल्या पाच महिन्यात पहिल्यांदा एकाच दिवशी १८५ जण तपासणीमध्ये कोरोना बाधीत आढळून आहे. त्यामुळे जिल्ह्यात संसर्गाची व्याप्ती वाढली आहे. वर्तमान स्थितीत जिल्ह्यात १,०६० अॅक्टीव्ह रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
गुरूवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेले व रॅपीड टेस्टमध्ये तपासणी करण्यात आलेल्या ७२४ जणांचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये ५३९ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले तर १८५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये चिखलीत १३, शेलोडी, भालगाव, पेठ, गांगलगाव येथे प्रत्येकी एक, शेगाव आटोळ येथे तीन, आसोला, मेंडगाव आणि देऊळगाव मही येथे प्रत्येकी एक, खामगावमध्ये सात, लाखनवाडा नऊ, मेहकर दहा, बुलडाणा येथे २९ जण पॉझिटिव्ह आले. यात पोलिस अधीक्षक कार्यालयातील दोघांचाही समावेश आहे. शेगावमध्ये २४, माटरगाव एक, नांदुरा आठ, नायगाव चार, निमगाव १२, जानेफळ तीन, डोणगाव १२, जामगाव तीन, सिं. राजा शहर एक, मलकापूर दोन, लोणवडी, फत्तेपुर, केसापूर येथे प्रत्येकी एक, देऊळगावराजात १२, झोटिंगा १, सवडत चार, बारलिंगा तीन, जळगाव जामोद १३ आणि वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील एक या प्रमाणे १८५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवशी १८५ रुग्ण सापडण्याची ही पहिलीच घटना आहे.
९९ जणांची कोरोनावर मात
गुरूवारी बाधीतांपैकी ९९ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये साखरखेर्डा, कदमापूर, निमखेड, शिंदी हराळी, मेहकर, उंबरखेड, माळेगाव, धामणगाव बढे, धाड, मोहोज, सुलतानपूर आणि चिखली येथील प्रत्येकी एक, भालेगाव बाजार, जयपूर लांडे येथील प्रत्येकी दोन, सोनेवाडी चार, खामगाव २३, , देऊळगाव राजा सहा, बुलडाणा २१, हतेडी तीन, मलकापूर आठ, लोणार दोन, शेगाव आठ, जलंब एक, नांदुरा येथील एकाजणाचा समावेश आहे. या व्यतिरिक्त पुणे, अमरावती येथील प्रत्येकी एक व अकोला येथील दोघांचा समावेश आहे. जिल्हयातील १९,००१ संदिग्ध रुग्णांचे आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह आले असून बाधीतांपैकी २,४०५ रुग्णही बरे झाले आहेत.