रस्ते विकासासाठी १९ कोटी
By admin | Published: March 11, 2016 02:55 AM2016-03-11T02:55:30+5:302016-03-11T02:55:30+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी १९ कोटी २ लाख रुपयांचा निधी मंजूर.
बुलडाणा : जिल्ह्यातील रस्ते विकासासाठी बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे रस्ता विकासासाठी सुमारे १९ कोटी २ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही माहिती मंगळवारी केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्रालय नवी दिल्लीचे अवर सचिव राजेंद्र कुमार यांनी दिली आहे. राज्यातील जिल्ह्यांमध्ये केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत हा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये खामगाव ते लोणार रोडवर असलेल्या मिस्कीनवाडी ते नायगाव (६ कोटी रु.), चांगेफळ-भेंडवळ-भास्तन-माटरगाव ते खामगाव (२ कोटी ८0 लाख रु.), सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे पालखी रस्ता बांधकामासाठी (५ कोटी २२ लाख रु.), शेगाव तालुक्यातील एकफळ ते अळसणा रस्त्यावरील पूल बांधकामासाठी (५ कोटी रु.) या कामांसाठी हा निधी वापरण्यात येईल. केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन विभागाकडील निधी जिल्ह्याला मिळावा, यासाठी खा. जाधव यांनी ना.नितीन गडकरी यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता.