खडकपूर्णा धरणाचे 19 दरवाजे उघडले

By Admin | Published: October 3, 2016 08:16 PM2016-10-03T20:16:18+5:302016-10-03T20:16:18+5:30

जालना जिल्ह्यासह सिल्लोड आणि देऊळगावराजा तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून पडलेल्या दमदार पावसामुळे खडकपूर्णा (संत चोखासागर) धरण ९९ टक्के

The 19 doors of the Khadakpura dam opened | खडकपूर्णा धरणाचे 19 दरवाजे उघडले

खडकपूर्णा धरणाचे 19 दरवाजे उघडले

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
 
बुलडाणा, दि. 3 - जालना जिल्ह्यासह सिल्लोड आणि देऊळगावराजा तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून पडलेल्या दमदार पावसामुळे खडकपूर्णा (संत चोखासागर) धरण ९९ टक्के भरले आहे. पाण्याचा वाढता प्रवाह बघता धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या धरणाचे १९ दरवाजे उघडण्यात आले आहे.
 
खडकपूर्णा धरण पूर्णत: भरल्याने या भागातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. १६०.६१ दलघमी क्षमता असलेल्या या धरणात सोमवारी सायंकाळपर्यंत १६०.०२५ दलघमी पाणीसाठा आहे. सोमवारी धरणाचे संपूर्ण १९ दरवाजे उघडून पाणी खडकपूर्णा नदीपात्रात सोडण्यात आले. सोमवारी सकाळी ७ वाजेनंतर पाच दरवाजे १० सें.मी. ने उघडून सोमवारी दिवसभर पाणी सोडले. सायंकाळी ६ वाजतानंतर तीन दरवाजे १० सें.मी. ने तर दोन दरवाजे २० सें.मी.ने उघडून पाणी सोडण्यात येत आहे. 

Web Title: The 19 doors of the Khadakpura dam opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.