खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडले, बुलढाणा जिल्ह्यातील सहा प्रकल्प ओव्हर फ्लाे
By संदीप वानखेडे | Published: September 19, 2022 02:13 PM2022-09-19T14:13:17+5:302022-09-19T14:14:34+5:30
Khadakpurna: बुलढाणा जिल्ह्यात १८ सप्टेंबर राेजी अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वात माेठा असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाचे सर्व १९ दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले आहेत
- संदीप वानखडे
बुलढाणा : जिल्ह्यात १८ सप्टेंबर राेजी अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वात माेठा असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाचे सर्व १९ दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले आहेत. नदीपात्रात २० हजार ७४८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या वर्षात धरणाचे सर्व दरवाजे प्रथमच उघडण्यात आले आहेत.
जिल्ह्यात दाेन दिवसांपासून सुरू असलेल्या जाेरदार पावसामुळे सर्वच प्रकल्पांच्या जलसाठ्यात माेठी वाढ झाली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने १९ सप्टेंबर राेजी सकाळी ९ वाजता सर्वच दरवाजे ०.३० सेंमीने उघडण्यात आले आहेत. नदीपात्रात २० हजार ७४८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. माेठ्या प्रमाणात विसर्ग हाेत असल्याने नदीला पूर आला असून, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पही ओव्हर फ्लाे झाला असून, ९ दरवाजे २० सेंमीने उघडण्यात आले आहेत. तसेच मस, काेराडी, पलढग, उतावळी या प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग हाेत आहे. ज्ञानगंगा प्रकल्पात ९८, तर मन प्रकल्पाचा जलसाठा ९८.७७ टक्क्यांवर पाेहोचला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचेही माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.