१९१ सिमेंट नाला बांध होणार

By admin | Published: April 17, 2015 01:36 AM2015-04-17T01:36:09+5:302015-04-17T01:36:09+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील ८१ गावांमध्ये १९१ सिमेंट नाला बांध तयार करण्याचे नियोजन; तब्बल २७ कोटींचा खर्च अपेक्षीत.

191 cement canals will be damaged | १९१ सिमेंट नाला बांध होणार

१९१ सिमेंट नाला बांध होणार

Next

बुलडाणा : जलयुक्त शिवार अभियानाच्या आराखड्यानुसार ३३0 गावांमध्ये जलसंधारणाची कामे होणार आहेत. यामध्ये ८१ गावांमध्ये १९१ सिमेंट नाला बांध तयार करण्याचे नियोजनअसुन त्यासाठी तब्बल २७ कोटींचा खर्च अपेक्षी त आहे. या सिमेंट नाला बांधमुळे भुजल पातळी वाढण्यासोबतच जलस्त्रोत बळकटीकरणाचाही लाभ होणार आहे. ह्यसर्वांंसाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र २0१९ह्ण अंतर्गत जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. या त ३३0 गावांमध्ये नऊ विभागांच्या माध्यमातून जलसंधारणाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. कृषी, वन, सामाजिक वनीकरण, लघुसिंचन व जलसंधारण , जिल्हा परिषदेचा लघुसिंचन विभाग, जलसंपदा, भूजल सर्वेक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा योजना व ग्रामपंचायती आदीं मार्फत सिंमेट नाला बांध निर्माण करण्याचे नियोजन पुर्ण झाले असुन त्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत. या बंधार्‍यांचे आयुष्य हे २३ वर्ष असुन ५ वर्ष देखभाल दूरूस्ती संबधीत ठेकदाराला करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)टँकरग्रस्त गावांमध्ये सिमेंट नाला बांध बांधून जलस्त्रोत बळकटीकरणाचा प्रयोग यापूर्वी यशस्वी झाला आहे त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानात सिमेंट नाला बांध वर विशेष भर दिला असुन हे काम कालबद्ध पद्धतीने पुर्ण होऊन येणार्‍या पावसाळयात त्याचा लाभ होईल असे नियोजन केले आहे.

Web Title: 191 cement canals will be damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.