पंजाब नॅशनल बँकेत पीक विमा योजनेत २.८४ कोटींचा घोळ; संबंधितांवर गुन्हा दाखल
By सदानंद सिरसाट | Published: September 17, 2022 12:24 AM2022-09-17T00:24:35+5:302022-09-17T00:25:13+5:30
सन २o१८ ते २0२o या कालावधीत शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून विम्याचा हफ्ता कपात करण्यात आला.
खामगाव : शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून विम्याचा हफ्ता कपात केल्यानंतर त्याचा कंपनीकडे भरणा न करण्याचा प्रकार खामगावातील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत घडला आहे. २ कोटी ८४ लाख रुपयांच्या घोळ प्रकरणी बँकेच्या प्रबंधकांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांन बँक कर्मचारी श्रीतेज अरूण बुरूकले याच्यावर शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.
सन २o१८ ते २0२o या कालावधीत शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून विम्याचा हफ्ता कपात करण्यात आला. ती कपात केलेली रक्कम संबंधित विमा कंपनीकडे जमाच झाली नाही. एकुण २ कोटी ८४ लाख रुपये रकमेचा घोळ झाला. सोबतच ८८ शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातून रक्कम वळती करून अपहार केल्याचे पुढे आले आहे.
याप्रकरणी बँकेचे प्रबंधक आनंद प्रधान, शाखा व्यवस्थापक शंतनू राऊत यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी भांदवीच्या ४0९, ४७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.