२ हजार ३८९ लोकांनी घेतली कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:34 AM2021-04-17T04:34:37+5:302021-04-17T04:34:37+5:30
यामध्ये ४५ वयोगट ते ६५ वर्षांपर्यंतच्या महीला व पुरुषांना ही लस देण्यात आली आहे. यामध्ये अमडापूर ८९५ , इसोली ...
यामध्ये ४५ वयोगट ते ६५ वर्षांपर्यंतच्या महीला व पुरुषांना ही लस देण्यात आली आहे.
यामध्ये अमडापूर ८९५ , इसोली ४७८, धानोरी ७२, सावरखेड बुजरूक ३,सावरखेड खुर्द २,कारखेड ६६ , पिंपरखेड ९३, हराळखेड १०४, मेडसिंगा ००,मंगरूळ नवघरे ३१५, नायगाव बुजरूक २०, नायगाव खुर्द ९, डोंगरगाव २, सावंगी गवळी ४७,ऐनखेड ६, वरखेड ६२, करतवाडी १७, महिमळ ९, दहीगाव ५६, कव्हळा ३१४, खामखेड ४, करणखेड १७, टाकरखेड (मु)९२ व इतर ५८ आदींचा समावेश आहे़ काेराेना संसर्ग राेखण्यासाठी आराेग्य विभागाच्या वतीने लसीकरण करण्यात येत आहेत़ ज्या गावातील नागरिकांनी लसीकरण केले नाही, त्यांनी लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये यावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी मनीषा खरात, डॉ़ बाविस्कर यांनी केले आहे. या लसीचा तुटवडा आला होता़ परंतु आता ही लस पुन्हा उपलब्ध झाल्याने ही लस घेण्यासाठी नागरिकांनी यावे़ या कोरोनाबाबत अमडापरचे सरपंच वैशाली संजय गवई यांनी ग्रामपंचायत स्तरावरून जनजागृती सुरू केली आहे.