दिवाळीत बाजारपेठेत २0 कोटींची उलाढाल
By admin | Published: November 1, 2016 12:20 AM2016-11-01T00:20:19+5:302016-11-01T00:20:19+5:30
दुचाकी वाहन, सोने खरेदी वाढली; कपडा व ईलेक्ट्रॉनिक वस्तुलाही मागणी.
बुलडाणा, दि. ३१- दिवाळी सणावर दुष्काळाचे सावट असताना यावर्षी शेवटच्या तिन दिवसात दिवाळीच्या खरेदीमध्ये वाढ होऊन यंदाही दिवाळीत कोटीचा धमाका झाल.ा. एकट्या बुलडाणा शहरात तीन दिवसात २0 कोटीची खरेदी झाली. यामध्ये दुचाकी वाहन, सोनेचांदी व कपड्या बरोबरच ईलेक्ट्रॉनीक क्षेत्रातही मोठी उलाढाल झाली. यंदाच्या दिवाळीत एलईडी टीव्ही, फ्रीज यांना सर्वाधिक मागणी होती. दुचाकी वाहनामध्ये एका शोरूम मध्ये तीन दिवसात १२00 वाहनाची विक्री झाली तर, शहरातील दुसर्या एका शोरूम मध्ये ३00 वाहने विकल्या गेली. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळीचा सण आल्यामुळे तसेच अनेक कर्मचार्यांना बोनस व पगार मिळाल्यामुळे कर्मचार्यांनी दिवाळीची खरेदी मोकळ्या हाताने केली.
यावर्षी परतीच्या पावसामुळे सोयाबीन व कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिकाचे उत्पन्नात घट झाली. त्यामुळे काही भागात दुष्काळाचे सावट ेअसल्यामुळे यावर्षी दिवाळीची खरेदी फार राहणार नाही असा व्यापार्यांचा अंदाज होता. दिवाळीच्या तीन दिवस आधी पर्यंत मार्केटमध्ये शुकशुकाट होता. रविवार २३ ऑक्टोबर रोजी दिपावली पूर्व बाजारात गर्दी कमी दिसून आली. मात्र ३0 ऑक्टोबर रोजी लक्ष्मी पूजन असल्यामुळे तीन दिवसापासून बाजारात मोठी गर्दी दिसून आली. तसेच प्रारंभी तीन दिवस फटाका बाजारात शुकशुकाट होता. मात्र धनतेरस व लक्ष्मीपुजनच्या दिवशी फटाक्याची खरेदी वाढल्याचे व्यापार्यांनी सांगीतले.