२० केएलचा ऑक्सिजन प्लॅन्ट सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:04 AM2021-03-04T05:04:24+5:302021-03-04T05:04:24+5:30
--धावाधाव थांबणार-- मधल्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा होता त्या काळात कोविड समर्पित रुग्णालय तथा अन्न व अैाषध प्रशासन विभागाच्या अधिकारी ...
--धावाधाव थांबणार--
मधल्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा होता त्या काळात कोविड समर्पित रुग्णालय तथा अन्न व अैाषध प्रशासन विभागाच्या अधिकारी आणि डॉक्टरांना अकोला, औरंगाबादसह अन्य ठिकाणांहून ऑक्सिजनचे सिलिंडर मागवावे लागत होते. राज्यभरातच त्यावेळी तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे ऑक्सिजन सिलिंडरची जुळवाजुळव करण्यात अख्खी रात्र जागून काढावी लागत होती. आता ही धावपळही थांबणार आहे.
--निम्मा खर्च होणार कमी--
हा प्लँट सुरू झाल्यामुळे जेथे ऑक्सिजन सिलिंडरसाठी १५ दिवसाला पाच लाख रुपये खर्च येत होता तेथे तो आता दोन ते अडीच लाखांवर येणार आहे. त्यामुळे खर्चाचीही बचत होण्यास मदत होईल, असे सूत्रांनी सांगितले.
--जनरेशन प्लँटची तयारी--
लिक्विड ऑक्सिजन प्लँटसोबतच आता ऑक्सिजन जनरेशन प्लँट उभारण्याच्या दृष्टीने पावले पडत असून राज्य शासनाकडून हा प्लँट येथे दिला जाणार आहे. तो कार्यान्वित झाल्यास कोविड समर्पित रुग्णालय व जिल्ह्यातील आरोग्य विभाग ऑक्सिजन बाबतीत स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल. त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी यासंदर्भात यापूर्वीच निर्देश दिलेले आहेत.