बोगस जमीन व्यवहारप्रकरणी २० लक्ष रुपयांचा करावा लागणार भरणा; खामगावात येण्यास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2022 09:29 PM2022-09-20T21:29:53+5:302022-09-20T21:30:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: बनावट कागदपत्र आणि स्टॅम्पद्वारे परस्पर प्लॉटची खरेदी-विक्री प्रकरणात खामगाव येथील व्यावसायिक प्रदीप राठी याला मुंबई ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: बनावट कागदपत्र आणि स्टॅम्पद्वारे परस्पर प्लॉटची खरेदी-विक्री प्रकरणात खामगाव येथील व्यावसायिक प्रदीप राठी याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपाठीने मंगळवारी सशर्त जामीन मंजूर केला. २० लक्ष रुपयांचा भरणा करण्यासोबतच खामगावात येण्यास बंदी देखील राठी याला घालण्यात आली.
टेंभूर्णा शिवारातील तब्बल १४ पेक्षा अधिक भूखंडांची बनावट दस्तऐवजाच्या आधारे खामगाव येथील व्यावसायिक प्रदीप राठी याने खरेदी आणि विक्री केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर अंजू लवकेश सोनी यांच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलिसांनी प्रदीप राठी विरोधात भादंवि कलम २५५, २६०, ४२०, ४२३, ४६५, ४६८, ४७१, ४७२, ४७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर शहर पोलिसांनी प्रदीप राठी याला अटक केली. दरम्यान, तब्बल १८ महिन्यांपेक्षा अधिक काळ अटक असलेल्या प्रदीप राठी याला मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला. २० लक्ष रुपयांचा भरण्याच्या अटी व शर्तीसोबतच खामगावात येण्यास देखील राठी याला बंदी घालण्यात आली आहे. न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या एकलपीठाने हा निर्णय मंगळवारी दिला.