बाजारात मिरची २०, तर घराजवळ ४५ रु. किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:32 AM2021-08-01T04:32:03+5:302021-08-01T04:32:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : येथील आठवडी बाजारात भरणाऱ्या हर्रासीत ठोक दराच्या दुप्पट भावांत घराजवळील हातगाडीवर भाजीपाला विक्री केली ...

20 in the market and Rs. 45 near the house. Kg | बाजारात मिरची २०, तर घराजवळ ४५ रु. किलो

बाजारात मिरची २०, तर घराजवळ ४५ रु. किलो

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : येथील आठवडी बाजारात भरणाऱ्या हर्रासीत ठोक दराच्या दुप्पट भावांत घराजवळील हातगाडीवर भाजीपाला विक्री केली जात आहे. ही तर सर्वसामान्यांची लूटच आहे. पाव-अर्धा किलो भाजीपाला आणण्यास बाजारात जाणे शक्य नसल्याने हा सर्व प्रकार ग्राहकांना सहन करावा लागत असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

मागणीच्या तुलनेत स्थानिक क्षेत्रातील उत्पादन कमी पडत असल्याने बुलडाणा शहरातील भाजीपाल्याच्या हर्रासीमध्ये दूरदुरून भाजीपाला, फळे विक्रीला येतात; मात्र पावसामुळे कुठे दरड कोसळल्याने वा रस्ते खरडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. डिझेलचा वाढता खर्च पाहता चढ्या दराने भाजीपाला विकला जात असला तरी चिल्लर विक्रेते या भागात त्याच्या दुप्पट दराने विक्री करीत आहेत. शहरातील काही भागांत हिरवी मिरची तब्बल ५० ते ५५ रुपये प्रतिकिलो अशी विकली जात असल्याचे किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी सांगितले.

पिकवतात शेतकरी; जास्तीचा पैसा तिसऱ्याच्या हातात

शेतकरी राब-राब राबून ऊन-वारा सहन करीत, जिवाचा आटापिटा करून भाजीपाला पिकवितो. त्याकरिता तीन ते चार महिने त्याला कष्ट करावे लागतात, तसेच खर्चही बराच करावा लागतो. त्यात निसर्गाच्या लहरीपणाचाही फटका बसतो. फवारणीचे औषध महाग झाले आहे. त्याचाही खर्च करावा लागतो. त्यानंतर भाजीपाला निघाल्यावर सायंकाळी भरून तो पहाटे बाजारात आणतो. उत्पादन खर्चासह वाहतूक खर्च पाहता त्याला तोकडे उत्पन्न मिळते; मात्र बाजारातून ग्राहकांपर्यंत भाजीपाला पोहोचविण्याचा मोबदला त्यापेक्षा अधिक विक्रेता मिळवितो.

एवढा फरक कसा?

भाजीपाला बाजारात येतो तेव्हा त्याची बोली लावतो दलाल. खरेदी करतो अडत्या आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवितो चिल्लर विक्रेता, अशी ही साखळी निर्माण झाली आहे; मात्र शेतकरी वगळता सर्वांना भाव ठरविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे बाजारात पोहोचलेल्या मालाची विक्री आपला नफा पाहून हे विक्रेते ठरवीत असल्याने दरांत इतका फरक दिसून येतो, असे दलालांचे म्हणणे आहे.

हा बघा दरांतील फरक (प्रतिकिलो दर)

ठोक दर चिल्लर दर

कांदा २० ३०

बटाटा १५ २०

लसूण ८० १२०

टोमॅटो १५ ३०

वांगी १५ ४०

फूलकोबी ३० ४०

पानकोबी ३० ४०

पालक २५ ४०

कारले २० ४०

दोडके ३० ६०

भोपळा २० ४०

सध्या पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे़ त्यामुळे, भाव वाढलेले आहेत़ ठाेकचे आणि चिल्लरचे भाव यांच्यामध्ये तफावत असते़ १० ते १५ रुपयांचा फरक त्यामध्ये पडू शकताे़

सचिन गडाख, व्यापारी

अर्धा किलाे, पावभरासाठी हाेलसेल बाजारात जाणे परवडत नाही

राेज लागणारा भाजीपाला कमी लागताे़ रस्त्यावर महाग मिळत असला तरी अर्धा किलाे, पावभरासाठी हाेलसेल बाजारात जाणे परवडत नाही़ त्याचा फायदा काही भाजीविक्रेते घेतात़

सरला पाखरे, गृहिणी

घराजवळ असलेल्या बाजारातूनच भाजीपाला खरेदी करताे़ घरापासून आठवडी बाजार दूर असल्याने पर्याय नाही़ आठवडाभरासाठी लागणारा भाजीपाला खरेदी करून ठेवायला परवडत नाही़ त्यामुळे, महाग मिळत असला तरी तो खरेदी करताे़

- सुवर्णा वाघ, गृहिणी

Web Title: 20 in the market and Rs. 45 near the house. Kg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.