उपवासाची भगर खाल्ल्याने २० जणांना विषबाधा; चिखली तालुक्यातील सहा, तर जाफ्राबादमधील दोन जणांचा समावेश

By ब्रह्मानंद जाधव | Published: September 22, 2022 05:54 PM2022-09-22T17:54:38+5:302022-09-22T17:57:09+5:30

चिखली तालुक्यातील सहा, तर जाफ्राबादमधील दोन गावातील रूग्णांचा समावेश

20 people poisoned by eating fasting bhagar; Six from Chikhli taluka and two from Jaffrabad | उपवासाची भगर खाल्ल्याने २० जणांना विषबाधा; चिखली तालुक्यातील सहा, तर जाफ्राबादमधील दोन जणांचा समावेश

उपवासाची भगर खाल्ल्याने २० जणांना विषबाधा; चिखली तालुक्यातील सहा, तर जाफ्राबादमधील दोन जणांचा समावेश

Next

चिखली : एकादशीच्या उपवासाला भगर खाल्ल्याने चिखली तालुक्यातील सहा, तर शेजारील जफ्राबाद तालुक्यातील दोन गावातील २० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार २२ सप्टेंबरच्या समोर आला. विविध गावातील या रूग्णांवर येथील चार खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, ऐन नवरोत्रोत्सवाच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

बुधवार २१ सप्टेंबर रोजी एकादशी होती. तालुक्यातील पेठ, आमखेड, गोद्री, साकेगाव, भालगाव, सिंदी हराळी या सहा गावांसह जाफ्राबाद तालुक्यातील वरूड व कोळगाव येथील भाविकांनी फराळासाठी आपल्या गावातील विविध किराणा दुकानांतून भगर व भगरीच्या पिठाची खरेदी केली होती. दरम्यान, या भगरीचा फराळ खाल्ल्यानंतर अनेकांना मळमळ, उलटी, जुलाब, डोकेदुखी व घबराट आदी त्रास जाणवू लागला. काहींनी अॅसीडीटी असेल म्हणून सुरूवातीला दूर्लक्ष केले. मात्र, त्रास वाढल्याने नातेवाईकांची चांगलीच धांधल उडाली. नातेवाईक व ग्रामस्थांनी तातडीने त्रास होणाऱ्यांना चिखलीतील विविध खासगी रूग्णालयात दाखल केले.

शहरातील विविध रूग्णालयात उपचारार्थ दाखल रूग्णांची एकूण संख्या २० आहे. यामध्ये तायडे हॉस्पिटलमध्ये आमखेड येथील वंदना प्रदीप वाघ (४०), कमलबाई गजानन वाघ (५५), अंबादास भिमराव वाघ (४५), गोद्री येथील पांडूरंग विठ्ठल भवर (७०), सुमनबाई भवर (६५), पद्माबाई भवर (४०) व गायत्री भवर (२१) या सात रूग्णांवर उपचार सुरू आहे. डॉ.मिसाळ यांच्या दवाखान्यात साकेगाव येथील एकाच कुटूंबातील प्रदुम्न जगताप, नारायण जगताप व गीता जगताप यांच्यावर उपचार सुरू आहे.

चिंचोले हॉस्पीटलमध्ये शेषराव शेळके व कुशिवर्ता शेळके (रा.कोळगाव), विजय सुरडकर, अनिता सुरडकर, ओम सुरडकर (रा.शिंदी हराळी), व शीतल सोळंकी (रा.भालगाव) हे उपचार घेत आहेत. जयस्वाल हॉस्पिटलमध्ये भागूबाई जनार्दन सावळे (रा.वरुड) व उमाबाई वसंतराव ढोणे, वसंतराव संपतराव ढोणे (रा.पेठ) दाखल झाले आहेत. पानगोळे हॉस्पिटलमध्येही काही रूग्ण दाखल असल्याची माहिती आहे. विषबाधा झाल्यानंतर उपचारार्थ दाखल रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ.सुहास तायडे यांनी दिली.

रुग्णालयात दाखल झालेल्या सर्व रूग्णांना भगर खाल्याने उलटी, डोकेदुखी, चक्कर येणे, थरकाप आदी एकसारखी लक्षणे आहेत. उपचाराअंती सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर आहे. घाबरण्यासारखे काही नाही.

Web Title: 20 people poisoned by eating fasting bhagar; Six from Chikhli taluka and two from Jaffrabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.