पाचवी, आठवीच्या २० हजार ४२६ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा; ९०४ विद्यार्थ्यांनी मारली दांडी
By संदीप वानखेडे | Published: February 18, 2024 06:36 PM2024-02-18T18:36:58+5:302024-02-18T18:37:27+5:30
परीक्षेसाठी एकूण २१ हजार ३३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली हाेती.
बुलढाणा: पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) पूर्व माध्यमिक (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा रविवार, १८ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील २१३ केंद्रावर पार पडली. या परीक्षेसाठी एकूण २१ हजार ३३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली हाेती. त्यापैकी २० हजार ४२६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. तसेच ९०४ विद्यार्थ्यांनी दांडी मारली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता पाचवीच्या ११ हजार ३२७ विद्यार्थ्यांनी नाेंदणी केली हाेती. ११५ केंद्रावर १० हजार ८४९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. तसेच ४७८ विद्यार्थी अनुपस्थित हाेते.
आठवीसाठी ९८ परीक्षा केंद्रांवर बैठक व्यवस्था करण्यात आली हाेती़ या केंद्रावर १० हजार ०३ विद्यार्थ्यांपैकी ९ हजार ५७७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे़ तर ४२६ विद्यार्थी अनुपस्थित हाेते. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तेजराव नरवाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.आर. खरात, निरंतर विभाग शिक्षणाधिकारी वैशाली ठग, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर, उमेश जैन, जिल्हा परीक्षा समन्वयक शिक्षण विस्तार अधिकारी जयमाला राठोड आदींनी परिश्रम घेतले.