२0 टन तांदूळ सरकारी गोदामात जमा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:04 AM2017-08-25T00:04:14+5:302017-08-25T00:06:20+5:30

खामगाव: शहर पोलिसांनी रविवारी पहाटे २0 टन जप्त केलेला  तांदूळ  तत्काळ शासकीय गोदामात जमा केला. दरम्यान, तांदूळ  प्रकरणात रेशन कंत्राटदाराला शुक्रवारी आरोपी करण्यात आले  असून, या प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत असल्याचे पोलीस  प्रशासनही चक्रावून गेले आहे.

20 tons of rice deposited in government godown! | २0 टन तांदूळ सरकारी गोदामात जमा!

२0 टन तांदूळ सरकारी गोदामात जमा!

Next
ठळक मुद्देआरोपीमध्ये रेशन कंत्राटदाराचा समावेशतिसर्‍यांदा उल्लंघन: अधिकार्‍यांवर कारवाई नाही!कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटिस! 

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शहर पोलिसांनी रविवारी पहाटे २0 टन जप्त केलेला  तांदूळ  तत्काळ शासकीय गोदामात जमा केला. दरम्यान, तांदूळ  प्रकरणात रेशन कंत्राटदाराला शुक्रवारी आरोपी करण्यात आले  असून, या प्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढत असल्याचे पोलीस  प्रशासनही चक्रावून गेले आहे.
२0 ऑगस्टच्या पहाटे शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यू.के.  जाधव यांच्या मार्गदर्शनात खामगाव पोलिसांनी बाळापूर ना क्यावरून २0 टन तांदूळ  जप्त केला होता. 
या ट्रकमध्ये खाली असलेल्या बारदाण्यावर मध्यप्रदेश खाद्य  निगम, हरियाणा खाद्य निगम असे आढळून आले. त्यामुळे  पोलिसांनी ट्रक चालकासहित नांदुरा निवासी रेशन धान्य दुकानदार  ओम राठी यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची  गंभीरता पाहता, ठाणेदार यू.के. जाधव यांनी जिल्हा पोलीस  अधीक्षक शशीकुमार मीणा, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक  श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात तपास करताना जिल्ह्यात धान्याचा  काळाबाजार करणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त  केली होती. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांसह स्थानिक  आणि नांदुरा तहसीलदारांना पत्र देत, जप्त करण्यात आलेला  तांदूळ शासकीय गोदामात जप्त करण्याची मागणी केली होती.   शहर पोलिसांच्या पत्रावर मंगळवारीच जिल्हा पुरवठा  अधिकार्‍यांनी जप्त तांदूळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. 
त्यानुसार गुरुवारी निरीक्षण अधिकारी यांना प्राधिकृत  करून  पोलीस बंदोबस्तात तांदूळ शासकीय गोदामात जमा करण्यात  आला. यावेळी डीबी स्कॉडचे  अनिल देशमुख, संदीप टाकसाळ,  पीएसआय राठोड, सुनील राऊत यांच्यासह पोलीस कर्मचारी उ पस्थित होते. दरम्यान, या प्रकरणातील तपासाअंती जिल्हा पोलीस  अधीक्षक शशीकुमार मीणा आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक  श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार  यू.के. जाधव यांनी गुरुवारी सतीश गुप्ता यांना आरोपी केले आहे. 

तिसर्‍यांदा उल्लंघन: अधिकार्‍यांवर कारवाई नाही!
खामगाव येथे रेशनचा तांदूळ जप्त करण्यात येण्यापूर्वी २२ जून  २0१७ रोजी चिखली येथे एम एच १९-२0९७ या ट्रकमधून ३५0  कट्टे, २0 जुलै २0१७ रोजी धाड येथे एम एच 0२- एक्सए -  ६५४१ या वाहनातून १0२ कट्टे त्याचप्रमाणे २0 ऑगस्ट २0१७  रोजी खामगाव येथे एम.एच. २८ एबी ७९६९ या वाहनातून सुमारे  ४00 कट्टे तांदूळ जप्त करण्यात आला. दरम्यान,  कंत्राटातील  नियम व अटीनुसार  वाहतूक कंत्राटदाराने वाहतुकीसाठी उपयोगा त येणार्‍या वाहनांना संपूर्ण हिरवा रंग देऊन सदर वाहनांवर  ‘सार्वजनिक वितरण व्यवस्था सुधारित धान्य वितरण पद्धत  महाराष्ट्र शासन’ असे स्पष्ट लिहून सदर वाहनांना जिल्हाधिकारी  बुलडाणा यांच्याकडून लेखी मान्यता घेऊनच सदर वाहनाचा वाह तुकीसाठी उपयोग करणे आवश्यक आहे; मात्र उपरोक्त तीनही  घटनांमध्ये गाडीला हिरवा रंग आणि लिहिलेले आढळून आले  नाही. त्यामुळे धान्याचा काळाबाजार करणारा कंत्राटदार आणि  पुरवठा विभागाच्या संगनमताने हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.  दरम्यान, अधिकार्‍यांवरही कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटिस! 
जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलडाणा यांनी २१ ऑगस्ट रोजी श्रीना थ ट्रान्सपोर्ट अमरावतीचे संचालक पन्नालाल चोखेलाल गुप्ता  यांच्यावतीने मुखत्यारनामाद्वारा सतीश चोखेलाल गुप्ता यांना कारणे  दाखवा नोटिस बजावली होती. यामध्ये धान्य वाहतुकीच्या नियम  व अटीच्या भंगासंदर्भात अवगत करून दिले होते. जप्त करण्यात  आलेल्या तांदुळाला शासन जमा करून बाजारभावापेक्षा दुप्पट  वसुली करण्याचे, कंत्राट का रद्द केला जाऊ नये आदीचा खुलासा  २४ ऑगस्ट रोजी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांच्या समक्ष करण्याचे  आदेश दिले होते. खुलासा सादर न केल्याने तसेच कंत्राटाचा  नियमभंग करण्यात आल्यामुळे कारवाईचा इशाराही दिला होता. 

धान्याच्या काळ्याबाजाराची व्याप्ती फार मोठी असल्याची शक्यता  आपण यापूर्वीच व्यक्त केली होती. या गंभीर प्रकरणाचा वरिष्ठांच्या  मार्गदर्शनात तपास करण्यात आला. तसेच यातील पुरवठा  कंत्राटदाराला गुरुवारी आरोपी करण्यात आले.
- यू.के. जाधव, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन,  खामगाव

Web Title: 20 tons of rice deposited in government godown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.