काळा बाजारात जाणारा २0 टन गहू पकडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 12:23 AM2017-09-15T00:23:23+5:302017-09-15T00:23:55+5:30

लव्हाळा फाट्यावर बुलडाणा येथील गुन्हे  शाखा व मेहकर येथील महसूल विभागाच्या पथकाने  चिखली येथून वाशिमकडे जाणारा २0 टन गहू पकडला. 

20 tons of wheat going to the black market! | काळा बाजारात जाणारा २0 टन गहू पकडला!

काळा बाजारात जाणारा २0 टन गहू पकडला!

Next
ठळक मुद्देचिखली येथून वाशिमकडे गहू घेऊन निघाला होतालव्हाळा फाट्यावर पकडला ट्रकबुलडाणा गुन्हे शाखा व मेहकर येथील महसूल विभागाची  संयुक्त कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा: लव्हाळा फाट्यावर बुलडाणा येथील गुन्हे  शाखा व मेहकर येथील महसूल विभागाच्या पथकाने  चिखली येथून वाशिमकडे जाणारा २0 टन गहू पकडला. 
बुलडाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  मनोज केदारे यांना गोपनीय माहिती मिळाली की, चिखली ये थून सकाळी ४ वाजता ट्रक क्र.एम.एच.३७ जे ४६६३ ने  सार्वजनिक वितरण प्रणालीचा २0 टन गहू घेऊन वाशिमकडे  निघाला. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक मनोज केदारे,  मेहकरचे तहसीलदार संतोष काकडे, पुरवठा निरीक्षक सै.  एहसानोद्दीन सै. फसीयोद्दीन यांनी संयुक्त कार्यवाही करीत  लव्हाळा फाट्यावर ट्रक पकडला.  यावेळी रेशनचा गहू १९  टन ४९0 किलो किंमत अंदाजे ३ लाख ५0 हजार ८२0 रु पये, ट्रक क्रमांक एम.एच. ३७ जे ४६६३ किंमत १४ लाख,  चारचाकी वाहन क्रमांक एम.एच.२८ ए.एन.२११७ किंमत  अंदाजे ८ लाख रुपये, तीन मोबाइल ११ हजार असा एकूण  २५ लाख ६१ हजार ८२0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  सरकारतर्फे सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोज केदारे यांच्या  फिर्यादीवरून आरोपी मो. फारुख मो. इब्राहीम (वय ३0  वर्ष) रा. मंगलवाडी वेस वाशिम, वाजीद मिर्झा युसूफ मिर्झा  (वय ३0 वर्ष) रा. गड्डीपुरा वाशिम, अलताफ अजीज  कच्छी (वय ३२) रा. गोरक्षणवाडी चिखली, लक्ष्मण ऊर्फ  प्रकाश सखाराम कुडके वय ५४ रा. संभाजी नगर चिखली या  चौघांना अटक केली.  

Web Title: 20 tons of wheat going to the black market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.