Women's Day Special : २० वर्षात चंद्रप्रभा यांनी गाजविले तीन हजारांवर शंकरपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 11:37 AM2021-03-08T11:37:46+5:302021-03-08T11:37:53+5:30

Women's Day Special द्रप्रभा पाटील यांनी १९९० साली पहिल्यांदा शंकरपटात भाग घेतला होता.

In 20 years, Chandraprabha has won over three thousand bull races | Women's Day Special : २० वर्षात चंद्रप्रभा यांनी गाजविले तीन हजारांवर शंकरपट

Women's Day Special : २० वर्षात चंद्रप्रभा यांनी गाजविले तीन हजारांवर शंकरपट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क   
खामगाव : पुरूषांचीच मक्तेदारी असलेल्या शंकरपटात भाग घेऊन पुरूषांपेक्षा स्त्रीयाही कमी नाही हे सिद्ध चंद्रप्रभा पाटील यांनी सिद्ध केले आहे. आतापर्यंत त्यांनी तीन हजार शंकरपटात भाग घेतला आहे.
नांदुरा तालुक्यातील ज्ञानगंगापूर या गावाच्या रहिवासी असलेल्या चंद्रप्रभा पाटील यांनी डीएचएमएसचे शिक्षण पुर्ण केले. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतल्यावर त्यांनी नोकरी किंवा रूग्णालय सुरू न करता वेगळी वाट धरली. शंकरपट या मैदानी खेळाचे पूर्वी ठिकठिकाणी आयोजन केल्या जात होते. हजारो नागरिक हा खेळ पाहण्यासाठी गर्दी करीत होते. शंकरपट म्हटले की पुरूषच असा सर्वांचा समज होता. शंकरपट खेळणे तर दुरच हा खेळ पाहायलाही महिला येत नव्हत्या. मात्र, अशातच चंद्रप्रभा पाटील यांनी पुरूषांची मक्तेदारी मोडीत काढीत महिलाही हा खेळू शकतात, हे संपूर्ण जगाला दाखवून दिले. महाराष्ट्रातील या एकमेव महिला धुरकरी असतील. चंद्रप्रभा पाटील यांनी १९९० साली पहिल्यांदा शंकरपटात भाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत तब्बल ३ हजार शंकरपटात भाग घेतला आहे. त्यांनी छत्तीसगड व मध्यप्रदेशातही शंकरपटात भाग घेतला आहे. शंकरपटात भाग घेण्याकरिता संपूर्ण देशातूनच त्यांना बोलावणे येते. त्यांनी याची प्रेरणा त्यांचे वडिल श्रीराम रूपचंद महाले पाटील यांच्याकडून घेतली. ते पोलिस पाटील होते. त्यांच्या घरी शेती आणि एक बैलाची जोडी होती. सीमाताई लहानपणापासून वडिलांना शेतीकामात हातभार लावत होत्या. मुक्या जनावरांचा त्यांना विशेष लळा होता. लहानपणापासूनच धाडसी वृत्ती त्यांच्यात होती. चंद्रप्रभा यांचे वडील दरवर्षी शंकरपटात भाग घ्यायचे. एकदा त्या वडिलांसोबत शंकरपटात गेल्या. बैलांना धरून उभ्या असलेल्या चंद्रप्रभा यांना काही पुरुषांनी 'हा मर्दानी खेळ असून, महिलांनी यापासून दूरच राहावे, असे टोमणे मारले. त्यानंतर त्यांनी हा खेळ खेळण्याचा निश्चय केला. त्यांनी शेतातच बैलांना पळविण्याचा सराव सुरू केला. गाई, म्हशी जनावरांशी त्यांना विशेष लळा आहे. त्यांच्या घरच्या एका गाईने जुळी वासरे दिली. त्यांची नावे 'जीवन-पवन' अशी ठेवली. त्यांची चांगली जोपासना केली. त्यानंतर त्यांनी शंकरपटात भाग घ्यायचे ठरविले. वयाच्या विसाव्या वर्षी मोताळा तालुक्यातील पिंपळगाव नाथ येथील शंकरपटात १९९३ मध्ये त्यांनी पहिल्यांदा शंकरपटात भाग घेतला. त्यावेळी त्यांना टीकाही सहन करावी लागली. मात्र, न घाबरता त्यांनी उत्कृष्टपणे बैल पळविले. तेव्हापासून तर कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू होईपर्यंत त्या शंकरपटात सहभागी होत आहे. एक महिला शंकरपट खेळते ही त्यावेळी सर्वांसाठीच आश्चर्याची बाब होती. मात्र, चंद्रप्रभा यांनी पुरूषांची मक्तेदारी मोडीत काढली. 

Web Title: In 20 years, Chandraprabha has won over three thousand bull races

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.