पैसे भरूनही अमडापूर परिसरातील २०५ ग्राहक वीज जोडणीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 01:27 PM2017-12-08T13:27:53+5:302017-12-08T13:29:22+5:30
अमडापूर : वीज जोडणीसाठी सहा महिन्यापूर्वी पैसे भरूनही २०५ जण वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. वीज वितरणच्या अमडापूर येथील कार्यालयात या संबंधितांनी वीज जोडणीसाठीची रक्कम भरली होती. त्यामुळे वीज जोडणी केव्हा मिळणार असा प्रश्न या नागरिकांना पडला आहे.
अमडापूर : वीज जोडणीसाठी सहा महिन्यापूर्वी पैसे भरूनही २०५ जण वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. वीज वितरणच्या अमडापूर येथील कार्यालयात या संबंधितांनी वीज जोडणीसाठीची रक्कम भरली होती. त्यामुळे वीज जोडणी केव्हा मिळणार असा प्रश्न या नागरिकांना पडला आहे. अमडापूर आणि लगतच्या परिसरातील थकबाकी असलेले तथा अभय योजनेतंर्गत पहिल्या देयकाची रक्कम थकीत असलेल्या वीज ग्राहकांनी पैशाचा भरणा केला होता. तर तांत्रिक बिघाड तथा सदोष वीज मिटरमुळे अडचण झालेल्या १३८ वीज ग्राहकांनी त्यांच्या पैशाचा भरणा केला होता. दुसरीकडे नवीन वीज जोडणीसाठी ३२ घरगुती ग्राहकांनी पैशाचा भरणा केला होता. मात्र या जवळपास २०५ वीज ग्राहकांना सहा महिन्यापासून वीज जोडणीच मिळालेली नाही. त्यामुळे वीज वितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमडापूर येथील कार्यालयास मागणीपेक्षा कमी वीज मीटर देण्यातयेतात. त्यामुळे अनेक ग्राहकांना नवीन वीज मिटर मिळत नसल्याने समस्या आहे. प्रकरणी चिखली येथील वीज वितरणचे अधिकारी टिकार यांच्याशी संपर्क साधला असता नवीन वीज जोडणी मागणार्यांना एक महिन्याच्या आत वीज जोडणी दिली जाते. परंतु वरिष्ठ अधिकाºयाकडून नविन मिटरचा पुरवठा पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नसल्याने विलंब होत आहे. (वार्ताहर)
आमच्या कार्यालयामध्ये वरिष्ठांकडून विद्युत मिटरचा पुरवठा मागणी पेक्षा कमी येत असल्यामुळे व आलेल्या विद्युत मिटरमधून नविन जोडणी धारकांनाच मिटर देण्यात आले. त्यामुळे तांत्रीक बिघाड व पि.डी.झालेल्या ग्राहकांना विद्युत मिटरचा पुरवठा उपलब्ध होताच विद्युत मिटर देण्यात येईल. आर.आर.जुमळे सहाय्यक अभियंता महावितरण कंपनी कार्यालय,अमडापूर