बुलढाण्यात अवकाळी पाऊस अन् गारपिटीने २१ हजार ७६८ हेक्टरवरील शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2024 03:16 PM2024-02-28T15:16:29+5:302024-02-28T15:16:45+5:30

शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनी आणि तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

21 thousand 768 hectares of agriculture has been damaged due to unseasonal rain and hailstorm in Buldhana. |  बुलढाण्यात अवकाळी पाऊस अन् गारपिटीने २१ हजार ७६८ हेक्टरवरील शेतीचे नुकसान

 बुलढाण्यात अवकाळी पाऊस अन् गारपिटीने २१ हजार ७६८ हेक्टरवरील शेतीचे नुकसान

बुलढाणा जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पाऊस सोमवारी झाला होता. सिंदखेडराजा, देऊळगाव राजा जळगाव जामोद नांदुरा या तालुक्यात गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर देऊळगाव राजा तालुक्यात तालुक्यात असलेल्या आळंद येथे निबांच्या आकाराच्या गारी पडल्या. त्यामुळे शेड नेट सह इतर पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे.

गारांचा पाऊस येवढा होता की, काल 15 तासानंतर ही गारांचा खच कायम होता. त्यामुळे या भागातील गरांची तीव्रता कशी होते? हे दिसतेय या गारांचा खच एकत्र झाल्याने जवळपस 40 ते 50 कीलीचो गार तयार झाली आहे. ही गार पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केलीय. तर जिल्ह्यातील 21 हजार 768 हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनी आणि तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

Web Title: 21 thousand 768 hectares of agriculture has been damaged due to unseasonal rain and hailstorm in Buldhana.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.