२१०० ब्रास गाळाचा उपसा; ‘सुजलाम-सुफलाम’ बुलडाणा अभियानाला शेतक-यांचा हातभार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 01:28 AM2018-03-18T01:28:26+5:302018-03-18T01:28:26+5:30

खामगाव(जि. बुलडाणा) : बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्यावतीने सुरू असलेल्या ‘सुजलाम-सुफलाम’ गाळ उपसा अभियानाला शेतक-यांचाही उत्स्फूर्त हातभार लागत आहे. या मोहिमेंतर्गत खामगाव तालुक्यातील बोरजवळा लघू प्रकल्पातून अवघ्या आठवडाभरात २१०० ब्रास गाळाचा उपसा करण्यात आला. या प्रकल्पात दोन जेसीबी उपलब्ध करण्यात आल्या असून, दररोज ५० ते ७५ ट्रॅक्टरद्वारे गाळाचा उपसा केल्या जात आहे.

2100 brass extract; 'Sujlam-Suffalam' Buldhana campaign helps farmers! | २१०० ब्रास गाळाचा उपसा; ‘सुजलाम-सुफलाम’ बुलडाणा अभियानाला शेतक-यांचा हातभार!

२१०० ब्रास गाळाचा उपसा; ‘सुजलाम-सुफलाम’ बुलडाणा अभियानाला शेतक-यांचा हातभार!

Next
ठळक मुद्देदुष्काळमुक्तीसाठी भारतीय जैन संघटनेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव(जि. बुलडाणा) : बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्यावतीने सुरू असलेल्या ‘सुजलाम-सुफलाम’ गाळ उपसा अभियानाला शेतक-यांचाही उत्स्फूर्त हातभार लागत आहे. या मोहिमेंतर्गत खामगाव तालुक्यातील बोरजवळा लघू प्रकल्पातून अवघ्या आठवडाभरात २१०० ब्रास गाळाचा उपसा करण्यात आला. या प्रकल्पात दोन जेसीबी उपलब्ध करण्यात आल्या असून, दररोज ५० ते ७५ ट्रॅक्टरद्वारे गाळाचा उपसा केल्या जात आहे.
भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथा पुणे यांच्या संकल्पनेनुसार भारतीय जैन संघटना जलक्रांतीसाठी सज्ज झाली आहे. या मोहिमेंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील गाव तलावांतील गाळाचा उपसा करण्यात येत आहे. यासाठी भारतीय जैन संघटनेच्यावतीने १२० जेसीबी आणि १४ पोकलेन  देण्यात आले आहे. सोबतच तांत्रिक मनुष्यबळही संघटनेसह शासकीय स्तरावरून उपलब्ध करण्यात आले आहे.  
‘सुजलाम-सुफलाम बुलडाणा’ या अभियानाचा ३ मार्चपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ झाला. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने जिल्ह्यात सुजलाम सुफलाम अभियान राबविण्यात येत आहे. 
खामगाव तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या बोरजवळा येथील लघू प्रकल्पातील गाळ काढण्याच्या मोहिमेला ७ मार्च रोजी शुभारंभ करण्यात आला, त्यानंतर १६ मार्चपर्यंत तब्बल २१०० ब्रास गाळाचा उपसा करण्यात आला. दोन जेबीसीच्या साहाय्याने बोरजवळा येथील तलावातील गाळाचा उपसा केल्या जात असून, परिसरातील शेतकºयांकडून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गाळ उपसा आणि वाहतूक नियंत्रित करण्यासाठी  कालवा चौकीदार रामेश्वर पाटमोजे, मोजणीदार ए.बी. माडीवाले, जी.एस. राऊत शेतकºयांना सहकार्य करीत आहेत.
 
असा झाला गाळाचा उपसा!
८ मार्च    -७८.७५ (ब्रास)
९ मार्च    -१६३.७५
१० मार्च     -२५५.०५
१२ मार्च     -३०३.७५
१२ मार्च     -३०५.००
१३ मार्च     -२८१.००
१४ मार्च     -३०७.००
१५ मार्च     -३५६.७५
१६ मार्च     -३६०.०५

भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे शेती सुपीक होण्यास मदत होणार आहे. सुजलाम सुफलाम बुलडाणा अभियानाला हातभार लागावा म्हणून ट्रॅक्टरद्वारे गाळ वाहून नेत आहे.
- महेशआप्पा तोमर,
शेतकरी, बोरजवळा.

Web Title: 2100 brass extract; 'Sujlam-Suffalam' Buldhana campaign helps farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.