मेहकर तालुक्यातील २१९ अंगणवाड्यांना स्वतंत्र खोल्याच नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 05:45 PM2018-09-18T17:45:34+5:302018-09-18T17:45:56+5:30
मेहकर : तालुक्यातील २९९ अंगणवाड्यापैकी २१९ अंगणवाड्याना स्वातंत्र खोल्याच नाहीत, त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात अंगणवाड्यातील बालकांचे हाल होत आहेत. काही गावच्या अंगणवाड्या भाड्याच्या खोलीमध्ये भरविण्यात येतात.
- उध्दव फंगाळ
मेहकर : तालुक्यातील २९९ अंगणवाड्यापैकी २१९ अंगणवाड्याना स्वातंत्र खोल्याच नाहीत, त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात अंगणवाड्यातील बालकांचे हाल होत आहेत. काही गावच्या अंगणवाड्या भाड्याच्या खोलीमध्ये भरविण्यात येतात.
तालुक्यातील अंगणवाड्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पालकामध्ये नाराजी दिसून येत आहे. मेहकर येथील बालविकास प्रकल्प भाग एक व दोन अंतर्गत ग्रामीण भागात २९९ अंगणवाड्या आहेत. यापैकी केवळ ८० अंगणवाड्यांना स्वातंत्र खोल्या आहेत. तर २१९ अंगणवाड्यांना स्वतंत्र खोल्याच नाहीत. त्यामुळे ह्या अंगणवाड्या समाज मंदिर, शाळा आदी ठिकाणी भरविण्यात येतात. जवळपास ६० अंगणवाड्या ह्या भाड्याच्या खोलीत भरविण्यात येतात बालविकास प्रकल्प कार्यालय भाग एक अंतर्गत १६८ अंगणवाड्या आहेत. त्यापैकी ४५ अंगणवाड्यांना स्वतंत्र खोल्या आहेत. तर पाच अंगणवाड्या ह्या भाड्याच्या खोलीत भरविण्यात येतात. इतर अंगणवाड्या गावातील शाळा, समाज मंदिरात भरविण्यात येतात. बालविकास प्रकल्प कार्यालय दोन अंतर्गत १३१ अंगणवाड्या आहेत. यापैकी ३५ अंगणवाड्यांना स्वातंत्र खोल्या आहेत. नऊ ठिकाणच्या अंगणवाड्या ह्या भाड्याच्या खोलीत भरविण्यात येतात. २९९ अंगणवाड्यामध्ये जवळपास २० हजारच्यावर बालक आहेत. पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेक अंगणवाड्यांना स्वतंत्र खोल्या नसल्याने इतर ठिकाणी भरविण्यात येत असल्यामुळे बालकांचे हाल होत आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी स्वतंत्र्य खोल्या नाहीत, अशा ठिकाणी खोल्यांचे बांधकाम करून देण्यात यावे, अशी मागणी पालकामधुन होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
केवळ ६० अंगणवाड्यांनाच स्वतंत्र शौचालय
प्रत्येक शासकिय कार्यालय शाळा, अंणवाड्या या ठिकाणी स्वतंत्र शौचालय असले पाहिजे, असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र मेहकर तालुक्यात असलेल्या २९९ अंगणवाड्यापैकी ८० अंगणवाड्यांना स्वातत्र खोल्या आहेत. या ८० अंगणवाड्यापैकी केवळ ६० अंगणवाड्यांना स्वतत्र शौचालय आहेत. इतर अंगणवाड्यांना स्वतत्र शौचालय नाही.
बालविकास प्रकल्प भाग एक अंतर्गत ज्या गावात स्वतंत्र खोल्या नाहीत अशा गावात स्वतंत्र खोल्या बांधाव्यात यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून बालकांना बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था केलेली आहे.
- आर. के. सपकाळ,
बालविकास प्रकल्प अधिकारी, भाग एक मेहकर