२़ १९ लाख निराधारांना मिळणार आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:35 AM2021-04-16T04:35:06+5:302021-04-16T04:35:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी शासनाने ब्रेक चैनअंतर्गंत १४ एप्रिलच्या सायंकाळपासून कडक निर्बंध लावण्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : काेराेना संसर्ग राेखण्यासाठी शासनाने ब्रेक चैनअंतर्गंत १४ एप्रिलच्या सायंकाळपासून कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्बंधाच्या काळात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये यासाठी विविध याेजनांतील निराधार लाभार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे अनुदान देण्याची घाेषणा शासनाने केली आहे. या निर्णयाचा जिल्ह्यातील २ लाख १९ हजार ७५६ निराधारांना लाभ हाेणार आहे.
वृद्ध, निराधार, दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध याेजना राबवण्यात येतात. काेराेना संसर्ग राेखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. यामध्ये निराधारांचे हाल हाेऊ नये यासाठी त्यांना एक हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा जिल्ह्यातील २ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. निराधारांच्या खात्यात ही रक्कम लवकरच जमा करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले हाेते.
लाभार्थी म्हणतात...
गत वर्षापासून काेराेना संसर्ग वाढत असल्याने वेळाेवेळी लाॅकडाऊन करण्यात येत आहे. याचा परिणाम निराधार, वृद्धांनाही सहन करावा लागताे. शासनाने मदतीची घाेषणा केल्याने दिलासा मिळणार आहे.
-अशाेक जाधव, बुलडाणा
निराधारांना एक हजार रुपये देण्याचा शासनाने घेतलेला निर्णय याेग्यच आहे. या निर्णयामुळे निराधार लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. कडक निर्बंधामुळे अनेकांच्या राेजगाराचा प्रश्न निर्माण हाेणार आहे.
-राजेश इंगळे, बुलडाणा
शासनाच्या विविध याेजनांतर्गत निराधारांना मदत देण्यात येते. शासनाने कडक निर्बंधांच्या काळातही मदत देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. त्याची लवकरच अंमलबजावणी करावी.
-रुस्तम जाधव, बुलडाणा