२२ दिवसांची शाळा, अन् विद्यार्थ्यांची घुसमट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:32 AM2021-03-24T04:32:20+5:302021-03-24T04:32:20+5:30

बुलडाणा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची वर्षपूर्ती होत आहे. लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये दीर्घकाळ बंद राहिली. लॉकडाऊनच्या या काळात शिक्षण ...

22 days of school, infiltration of other students | २२ दिवसांची शाळा, अन् विद्यार्थ्यांची घुसमट

२२ दिवसांची शाळा, अन् विद्यार्थ्यांची घुसमट

googlenewsNext

बुलडाणा : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची वर्षपूर्ती होत आहे. लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये दीर्घकाळ बंद राहिली. लॉकडाऊनच्या या काळात शिक्षण विभागाचीच एक आव्हानात्मक परीक्षा बघायला मिळाली. वर्षभरात इयत्ता पाचवीनंतरचे वर्ग अवघे २२ दिवस भरले. ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला, त्यातही विद्यार्थ्यांची चांगलीच घुसमट झाली. कोरोना विषाणू संसर्गामुळे शाळा सुरू नसल्या तरी, विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले नाही. लॉकडाऊनच्या काळ शिक्षण विभागासाठीच नव्हे, तर विद्यार्थ्यांसाठीही एक आव्हानात्मक ठरला आहे. सुरुवातीला नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते. त्यानंतर इयत्ता पाचवीनंतरचे वर्ग २७ जानेवारीला सुरू करण्यात आले; परंतु २२ फेब्रुवारीला पुन्हा शाळा बंद कराव्या लागल्या. ऑनलाइन शिक्षण सर्वत्र सुरू आहे परंतु जिल्ह्यातील निम्या विद्यार्थ्यांनाच मोबाईलद्वारे ऑनलाइन शिक्षण दिले गेले आहे. जिल्हा परिषद शाळेतून व्हाॅट्स ॲपवर गृहपाठ पाठवून ऑनलाइन शिक्षण पूर्ण केला जात आहे. मात्र, इतर विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याने ऑनलाईन शिक्षणात अनेक अडचणी येत आहेत. ऑनलाईन शिक्षणामध्ये मोबाईल महत्त्वाचा असून, जिल्ह्यातील ५७ टक्के पालकांकडे ॲण्ड्राईड मोबाईलच नाही. मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचविणे अवघड जात आहे. ऑनलाईन शिक्षणात तांत्रिक अडचणींचा खोडा येत आहे. शिक्षकांनी गृहपाठ तयार करून विद्यार्थ्यांना व्हाॅट्स ॲपवर पाठविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. अनेक विद्यार्थ्यांना टी. व्ही. केबलद्वारे काहींना इतर माध्यमांद्वारे शिक्षण दिल्या जात आहे. ऑनलाईन शिक्षण घेत असताना अनेक अडचणी विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाल्या. ज्या पालकांकडे मोबाईल आहेत, ते बाहेर कामात असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यास पोहोचत नाहीत. ग्रामीण भागात इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होते.

लॉकडाऊनचे हे वर्ष शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी एक आव्हानात्मकच होते. परंतु जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचविण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना घरी बसूनच ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यात काही विद्यार्थ्यांना कंटाळवाणेही होत आहे.

सचिन जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.

मुलांच्या समस्या

शाळा बंद झाल्याने मुलांच्याही अनेक समस्या वाढल्या. ऑनलाईन शिक्षणामध्ये सतत मोबाईलसमोर बसल्याने, अनेक मुलांना डोळ्याचा, मानेचा त्रास आदी आरोग्याच्या समस्या उद्भवल्या. सवंगड्यांबरोबर खेळता येत नसल्याने त्यांची घुसमट झाली.

जिल्ह्यातील ऑनलाईन शिक्षणाची स्थिती

४३७५२४

एकूण विद्यार्थी संख्या

१४८५१४

टी.व्ही. केबलद्वारे शिक्षण घेणारे विद्यार्थ

१८७४६३

स्मार्ट फोनद्वारे शिक्षण घेणारे विद्यार्थी

Web Title: 22 days of school, infiltration of other students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.