दाेन गावांत एकाचदिवशी २२ पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:34 AM2021-05-26T04:34:37+5:302021-05-26T04:34:37+5:30
ग्रामीण भागात कोरोना रुग्ण निघण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़. डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या संपूर्ण गावात या रुग्णांच्या ...
ग्रामीण भागात कोरोना रुग्ण निघण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़. डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या संपूर्ण गावात या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांच्याही कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत़. यामध्ये अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याचे दिसून येत आहे़. एवढेच नव्हे, तर ग्रामीण भागात विलगीकरण कक्षही सुरू करण्यात आले असले, तरीही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे़. त्यामुळे डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्वच गावांमध्ये कोरोना चाचणी आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे़. ज्या गावांमध्ये रुग्ण सापडले, त्या गावातील सर्व नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात येणार असून, आज निघालेल्या विश्वी व भोसा गावातील संपूर्ण नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गवई यांनी सांगितले़. नागरिकांनी पाॅझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले असल्यास त्वरित कोरोना तपासणी करावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ़. अमोल गवई व कर्मचारी यांनी केले आहे.