२२ शाळांचा निकाल १०० टक्के; एका शाळेचा शून्य टक्के

By Admin | Published: May 31, 2017 12:47 AM2017-05-31T00:47:07+5:302017-05-31T00:47:07+5:30

बुलडाणा: जिल्ह्याने यावर्षी बारावीच्या परीक्षेत अमरावती विभागात दुसरा क्रमांक मिळविला आहे. जिल्ह्यातील २९६ पैकी २२ शाळा महाविद्यालयाने १०० टक्के निकाल देवून जिल्ह्यात अव्वल ठरल्या.

22 schools result in 100 percent; Zero percent of a school | २२ शाळांचा निकाल १०० टक्के; एका शाळेचा शून्य टक्के

२२ शाळांचा निकाल १०० टक्के; एका शाळेचा शून्य टक्के

googlenewsNext

बुलडाणा: जिल्ह्याने यावर्षी बारावीच्या परीक्षेत अमरावती विभागात दुसरा क्रमांक मिळविला आहे. जिल्ह्यातील २९६ पैकी २२ शाळा महाविद्यालयाने १०० टक्के निकाल देवून जिल्ह्यात अव्वल ठरल्या. तर शून्य टक्के निकालाची बुलडाणा तालुक्यातील एक शाळा आहे. तर विज्ञान शाखेचा ४५ विद्यालयाने, कला शाखेचा १० आणि वाणिज्य शाखेचा ७ विद्यालयाने १०० टक्के निकाल दिला.
जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील २९६ शाळा व महाविद्यालयातील आर्ट, विज्ञान व वाणिज्य शाखेतील ३१ हजार ४६३ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परिक्षा दिली होती. यातून २८ हजार ५७० विद्यार्थी उर्त्तीण झाले. बुलडाणा व देऊळगावराजा तालुक्यातील प्रत्येकी ४ विद्यालयाने १०० टक्के निकाल दिला. तर ज.जमोद तालुक्यातील ३, मेहकर, शेगाव, नांदुरा, मलकापूर प्रत्येकी २ आणि चिखली, मोताळा, लोणार, खामगाव प्रत्येकी १ अश्या एकूण २२ विद्यालयाने १०० टक्के निकाला दिला.
तर बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट येथील उर्दु आर्ट आॅड सायन्स कॉजेल चा शून्य टक्के निकाल लागला. या शाळेतून केवळ एकाच विद्यार्थ्यांने परिक्षा दिली होती. तर सिंदखेडराजा व संग्रामपूर तालुक्यातील एकाही शाळा महाविद्यालयाला १०० टक्के निकालाचा पल्ला गाठता आला नाही. यंदाच्या बारावीच्या निकालात जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांनी आपली चांगली प्रगती साधली.

१०० टक्के निकाल देणाऱ्या शाळा
- बुलडाणा तालुका
विद्या विकास विद्यालय, कोलवड
सहकार विद्यामंदीर, बुलडाणा
सरस्वती हायस्कुल, सुंदरखेड
अंजुमन उर्दु गर्ल ज्यू.कॉलेज,धाड

- मोताळा तालुका
नॅशनल उर्दु उच्च माध्यमिक विद्यालय, रोहीनखेड

- चिखली तालुका
सानिया उर्दु ज्यू.कॉलेज,चिखली

- देऊळगावराजा तालुका
स्वामी विवेकानंद विद्यालय, दे. माही, आदर्श ज्यू. कॉलेज,सिनगाव
समर्थ उच्च माध्य.विद्यालय,पांगरी
भास्कररावजी शिंगणे ज्यू.कॉलेज.

- लोणार तालुका
मोह.हानीफ सौदागर उर्दु ज्यू.कॉलेज सुलतानपूर

- मेहकर तालुका
महेश विद्यामंदीर व ज्यू.कॉलेज,मेहकर
जगदंबा ज्यू.कॉलेज, उकळीसुकळी

- खामगाव तालुका
श्री.कोकारे उच्च माध्य. विद्यालय, ढोरपगाव

- शेगाव तालुका
संत गजानन महाराज हायस्कूल, शेगाव, माऊली ज्यू. कॉलेज, शेगाव

- नांदुरा तालुका
डॉ.नाफिल अ.खान उर्दु ज्यू.कॉलेज, वडनेरभोलजी, कोठारी इंग्लिश स्कूल, नांदुरा

- मलकापूर तालुका
मधुभाऊ सावजी मेमोरीअल ज्यू.कॉलेज, मलकापूर

- जळगाव जामोद तालुका
संत तुलसीरामजी आर्ट ज्यू.कॉलेज, आसोलाबाजार, स्वामी विवेकानंद ज्ञानपिठ, रेनुकानगर
सातपुडा ज्यू.कॉलेज,वरवड

Web Title: 22 schools result in 100 percent; Zero percent of a school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.