वर्षभरात वाढले २२ हजार बेरोजगार

By admin | Published: August 26, 2015 11:37 PM2015-08-26T23:37:36+5:302015-08-26T23:37:36+5:30

बुलडाण्यातील चित्र ; ८७ हजार बेरोजगारांची फौज शोधतेय रोजगार.

22 thousand unemployed in the year | वर्षभरात वाढले २२ हजार बेरोजगार

वर्षभरात वाढले २२ हजार बेरोजगार

Next

बुलडाणा : बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार्‍या शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या विविध योजना आहे. याचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेतून जिल्ह्यात केवळ बेरोजगारांची फौज तयार होत असून, जवळपास ८७ हजार युवक-युवती रोजगाराच्या शोधात असल्याची बाब समोर आली आहे. युवा बेरोजगारांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाच्या श्रम व रोजगार विभागाकडून रोजगार संधी आणि बेरोजगारांचे सर्वेक्षण करण्यात येते. यातून प्रत्येक जिल्हा व मोठे शहर स्तरावरील रोजगार संधी आणि आर्थिक स्थितीचा वेध घेतला जातो. बुलडाणा जिल्ह्यात डिसेंबर २0१४ मध्ये असे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर जुलै २0१५ रोजगार विभागाकडून दुसरी पाहणी करुन सदर अहवाल सादर करण्यात आला. या माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यातील बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे तसेच जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडून प्राप्त ऑगस्ट २0१५ च्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण ८७,८५२ युवक-युवती बेरोजगार आहे. यात ३२,४३३ शहरी भागातील, तर ५५,४१९ ग्रामीण भागातील बेरोजगार आहेत. मार्च २0१४ मध्ये बेरोजगारांची ही संख्या ६५,१२६ इतकी होती. एक वर्षात तब्बल २२,७२६ बेरोजगारांची जिल्ह्यात वाढ झाली आहे.

Web Title: 22 thousand unemployed in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.