CoronaVirus : जळगाव जामोदमधील २,२०० नागरिकांची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 04:21 PM2020-05-11T16:21:54+5:302020-05-11T16:22:00+5:30
या भागातील २,२०० नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी तथा सर्व्हेक्षण होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : ग्रीन झोनच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद येथील एक फळविक्रेता ११ मे रोजी कोरोना पॉझीटीव्ह निघाला आहे. परिणामी ग्रीनझोनचे बुलडाणेकरांचे स्वप्न भंगले आहे. दरम्यान, संबंधीत फळविक्रेत्यासह त्याच्या नऊ नातेवाईकांना क्वारंटीन करण्यात आले आहे. दरम्यान, जळगाव शहराचा ४० टक्के भूभाग हा आता प्रतिबंधीत क्षेत्रात आला आहे. त्यामुळे या भागातील २,२०० नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी तथा सर्व्हेक्षण होणार आहे.
दुसरीकडे कोरोना पॉझीटीव्ह आलेल्या व्यक्तीचा जनसंपर्क चांगलाच दांडगा असल्यामुळे प्रशासनासमोर कोरोना बाधीत व्यक्तीची टेल हिस्ट्री तथा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. बाधीत रुग्णाच्या संपर्कातील ९ जणांचे स्वबॅ नमुने घेण्यात आले असून त्याच्या संपर्कातील आणखी १० जणांना खामगाव येथील कोरोना सुश्रूषा केंद्रात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. बुºहाणपुर येथे चार दिवसापूर्वी जळगाव जामोद येथील बाधीत रुग्ण एका अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. तेथील त्याचा एक नातेवाईक पॉझीटीव्ह निघाल्यामुळे आरोग्य विभागाकडे जावून त्याने तपासणी केली असता तो पॉझीटीव्ह निघाला आहे. त्यामुळे आता जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी कार्यालयासह संपूर्ण यंत्रणाच अलर्टवर आली आहे.
चहा पिणारेही धास्तावले
जळगाव जामोद मधील या चहाच्या दुकानावर चहा पिणारेही आता धास्तावले असून मडाखेड जिल्हा गटामध्ये येणाºया एका गावात तर थेट दवंडी देण्यात आली आहे. ज्यांनी या दुकानावर चहा घेतला आहे, त्यांनी आरोग्य केद्रात जावून आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले असल्याची माहिती आहे. समाजमाध्यमावरही यासंदर्भातील चित्रफित सध्या फिरत आहे.