२.२३ लाख निराधारांना मिळाला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 04:46 PM2020-10-06T16:46:31+5:302020-10-06T16:46:46+5:30
Buldhana News १०४ कोटी ११ लाख, ८४ हजार १४९ रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: निराधार, दिव्यांग, विधवा आदींना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. मार्च महिन्यापासून कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आले होते. अनेक योजनांचा निधी गोठवण्यात आलेला असताना निराधारांना गत चार ते पाच महिन्यांपासून अनुदानाचा आधार मिळत आहे.जिल्ह्यातील २ लाख २३ हजार ६७५ लाभार्थ्यांना आतापर्यंत १०४ कोटी ११ लाख, ८४ हजार १४९ रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जिल्ह्यात ३८ हजार २९७ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना १५ कोटी ८२ लाख ८ हजार ४६० रुपये जुलै ते आॅगस्ट दरम्यान वितरीत करण्यात आले आहेत. संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसुचीत जातीच्या ९ हजार १९५ लाभार्थ्यांना पाच कोटी, ३९ लाख १४ हजार ३०० रुपये तर अनुसुचीत जमातीचे जिल्ह्यात ८४८ लाभार्थी असून त्यांना ८२ लाख ५९ हजार १०० रुपये वितरीत करण्यात आले आहे. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंर्तंत जिल्ह्यात ९१ हजार ९६३ लाभार्थी असून त्यांना ५४ कोटी ५१ लाख ६५ हजार ८६० रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. श्रावसबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसुचीत जमातीचे २०१५ लाभार्थी आहेत. त्यांना एक कोटी २४ लाख ५१ हजार ७५१ रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. इंदिरा गांधी राष्टीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेच्या २ हजार २१९ लाभार्थ्यांना ८४ लाख ९० हजार ४९ रुपये अनुदान वितरीत करण्यात आले आहेत. इंदिरा गांधी राष्टीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनंतर्गंत २३ लाख ९४ हजार ७०० रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.