बुलडाणा जिल्हय़ात ‘आरटीई’ प्रवेशासाठी दोन हजार २८८ अर्ज दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:44 AM2018-02-26T01:44:00+5:302018-02-26T01:44:00+5:30
बुलडाणा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेशासाठी राज्यात सर्व ठिकाणी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया १0 फेब्रुवारीपासून सुरू असून, २८ फेब्रुवारी अंतिम मुदत आहे. यामध्ये जिल्ह्यातील २२0 शाळांमध्ये दोन हजार ९९३ विद्यार्थ्यांंचे प्रवेश घेण्यात येणार आहेत. अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस उरले असून, आतापर्यंत ७६ टक्के म्हणजे दोन हजार २८८ अर्ज प्राप्त झाले आहेत.
ब्रम्हानंद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेशासाठी राज्यात सर्व ठिकाणी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया १0 फेब्रुवारीपासून सुरू असून, २८ फेब्रुवारी अंतिम मुदत आहे. यामध्ये जिल्ह्यातील २२0 शाळांमध्ये दोन हजार ९९३ विद्यार्थ्यांंचे प्रवेश घेण्यात येणार आहेत. अर्ज भरण्यासाठी अवघे तीन दिवस उरले असून, आतापर्यंत ७६ टक्के म्हणजे दोन हजार २८८ अर्ज प्राप्त झाले आहेत.
शिक्षण हक्क कायद्याने (राइट टु एज्युकेशन म्हणजेच आरटीई) मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांंना मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले. मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा यामागील हेतू आहे. प्राथमिक किंवा ज्या प्राथमिक शाळेला पूर्वप्राथमिक वर्ग जोडला असेल, अशा शाळेच्या पहिल्या वर्गात एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. आरटीई अंतर्गत जिल्ह्यात २२0 नामांकित खासगी शाळा आहेत. २0१८-१९ या शैक्षणिक वर्षात २५ टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेण्याकरिता १0 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. आतापर्यंंत जिल्ह्यातील २ हजार ९९३ जागांसाठी २ हजार २८८ अर्ज प्राप्त झाले आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत २८ फेब्रुवारी असून, अद्याप ७0५ जागांसाठी अर्ज प्राप्त होणे बाकी आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यामध्ये इंटरनेट सुविधेचाही खोडा निर्माण होत असल्याने अनेक पालकांना आपल्या पाल्याचा अर्ज करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश मिळविण्यासाठी येत्या तीन दिवसांत पालकांना अर्ज करावे लागणार आहेत.
राज्यातून १ लाख २१ हजार अर्ज
आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशामध्ये राज्यातील ८ हजार ९८0 शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये राज्यभरात १ लाख २६ हजार १२९ विद्यार्थ्यांंचे प्रवेश घेण्यात येणार आहेत. अर्ज भरण्यासाठी तीन दिवस उरले असताना आतापर्यंंत ९६ टक्के म्हणजे १ लाख २१ हजार २८0 अर्ज प्राप्त झाले आहेत.
याच बालकांना मिळतो प्रवेश!
दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख रु पयांपर्यंंत आहे, अशा पालकांची बालके वंचित गटांतर्गत अनुसूचित जा ती, अनुसूचित जमाती आणि सर्व जाती-धर्मातील विकलांग बालके २५ टक्के ऑनलाइन प्रवेशासाठी पात्र ठरतात. त्यामुळे आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश करण्याकरिता आलेल्या अर्जापैकी अनेक अर्ज हे विविध त्रुटींमुळे रद्द होतात.
कागदपत्रांच्या अडचणी
प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पालकांना रहिवासी किंवा वास्तव्याचा पुरावा, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकार्यांचे जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांगत्व असल्यास तसे प्रमाणपत्र, तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांच्याकडून कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो. त्याच्या पूर्ततेसाठी मोठय़ा अडचणीही येत आहेत.
सन २0१८-१९ या शैक्षणिक वर्षात आरटीई २५ टक्के मोफत प्रवेशासाठी १0 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्यात येत असून, २८ फेब्रुवारी अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. शाळेच्या आरंभीच्या वर्गाच्या २५ टक्के प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत पद्धतीने प्रवेश दिले जातील.
- एस.टी. वराडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा