लसीच्या मर्यादित साठ्यामुळे २३ केंद्रे प्रभावित, १ मेच्या नियोजनास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:37 AM2021-04-28T04:37:23+5:302021-04-28T04:37:23+5:30

--१ मेनंतरचे नियोजन-- १ मेनंतर लसीकरण मोहीम कशा पद्धतीने राबवावयाची याबाबत प्रशासकीय पातळीवर सध्या नियोजन सुरू आहे. राज्य लसीकरण ...

23 centers affected due to limited stock of vaccine, May 1 planning started | लसीच्या मर्यादित साठ्यामुळे २३ केंद्रे प्रभावित, १ मेच्या नियोजनास प्रारंभ

लसीच्या मर्यादित साठ्यामुळे २३ केंद्रे प्रभावित, १ मेच्या नियोजनास प्रारंभ

Next

--१ मेनंतरचे नियोजन--

१ मेनंतर लसीकरण मोहीम कशा पद्धतीने राबवावयाची याबाबत प्रशासकीय पातळीवर सध्या नियोजन सुरू आहे. राज्य लसीकरण अधिकारी डॉ. पाटील यांनी यासंदर्भात २७ एप्रिल रोजी व्हीसीद्वारे आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने खासगी लसीकरण केंद्रावर प्रारंभी १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण केले जाणार असून, त्यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक असले. त्यासाठी खासगी केंद्र वाढविण्यात येणार असून, जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत त्याचा निर्णय होईल. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार ही कार्यवाही करण्यात येत असून, खासगी लसीकरण केंद्रांना लसीची किंमत ठरविता येईल. या खासगी लसीकरण केंद्रांना शासकीय लसीकरण केंद्राकंडून लस उपलब्ध केली जाणार नसल्याची माहिती आहे.

--आतापर्यंत लसीकरण--

५५ टक्के

१) जिल्ह्यात ४५ ते ६० वयोगटातील ६८ हजार ५९४ नागरिकांचे लसीकरण झाले असून, ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या २ लाख ६३ हजार ५० नागरिकांपैकी ९९ हजार ४८१ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

२) जिल्ह्यातील २३ हजार ६९७ हेल्थ वर्कर्सपैकी १४ हजार ९४४ हेल्थ वर्कसचे लसीकरण झाले असून, २३ हजार ९६८ फ्रंटलाइन वर्कर्सपैकी २० हजार २१४ जणांचे लसीकरण झाले आहे.

३) जिल्ह्यात १ लाख ७० हजार ६७० लसींचे व्हायल उपलब्ध झाले आहेत. त्यातून २ लाख ४३ हजार ७३९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: 23 centers affected due to limited stock of vaccine, May 1 planning started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.