कर्जमाफीसाठी २.३५ लाख ऑनलाइन अर्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 11:36 PM2017-09-04T23:36:15+5:302017-09-04T23:37:06+5:30

बुलडाणा:  शासनाने शेतकर्‍यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ जुलैपासून  सुरू झाली आहे. जिल्ह्यात ४ सप्टेंबरपयर्ंत २  लाख  ९१  हजार ९0३  शेतकर्‍यांची  नोंदणी झाली असून, २ लाख ३५ हजार २५0  शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज  प्राप्त झाले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ललित वराडे यांनी दिली आहे.

2.35 lakh online application for loan waiver! | कर्जमाफीसाठी २.३५ लाख ऑनलाइन अर्ज!

कर्जमाफीसाठी २.३५ लाख ऑनलाइन अर्ज!

Next
ठळक मुद्दे२४ जुलैपासून  सुरू झाली होती ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया४ सप्टेंबर पर्यंत २  लाख  ९१  हजार ९0३  शेतकर्‍यांची झाली नोंदणी जिल्हय़ात १२१0 केद्रांवर ऑनलाईन अर्ज भरण्यात येत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा:  शासनाने शेतकर्‍यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ जुलैपासून  सुरू झाली आहे. जिल्ह्यात ४ सप्टेंबरपयर्ंत २  लाख  ९१  हजार ९0३  शेतकर्‍यांची  नोंदणी झाली असून, २ लाख ३५ हजार २५0  शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज  प्राप्त झाले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ललित वराडे यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २0१७ च्या कर्जमाफीसाठी जिल्ह्यामध्ये एकूण  १२१0 केद्रांवर अर्ज भरण्यात येत असून,  त्यात आपले सरकार केंद्र, नागरिक सुविधा केंद्र, संग्राम केंद्र  यांचा समावेश आहे. या केंद्रावर बायोमेट्रिक यंत्र जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. हे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व शेतकर्‍यांचे अर्ज ऑनलाइन भरून होईपर्यंत ही केंद्रं सुरू राहणार आहेत. जिल्ह्यात १५ ऑगस्टनंतर ९0 महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. 

Web Title: 2.35 lakh online application for loan waiver!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.